मोठी बातमी! महाविकास आघाडीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, जागावाटप जाहीर होणार
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या (21 ऑक्टोबर) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ( Press conference) होणार आहे.
Mahavikas Aghadi Press conference : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. उद्या (21 ऑक्टोबर) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद ( Press conference) होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होणार आहे. कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. आमचं सगळं ठरलं आहे. त्यामुळं उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांनी दिली.
शरद पवार, संजय राऊत अनिल देसाई यांची बैठक
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जंयत पाटील, संजय राऊत आणि अनिल देसाई यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्यावरुन ठिणगी पडल्याची माहिती मिळाली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात काही ठिकाणच्या जागांवर तिढा असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. यावेळी माजी मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते. मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये त्यांनी भेट घेतली आहे. या भेटीनंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विदर्भातील एकूण 12 जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडीचा आमदार नाही. मविआचा आमदार नसलेल्याच 12 जागा आम्ही मागितल्या आहेत, असे ठाकरेंच्या शिवसेनेचे मत आहे. तर काँग्रेस हा पक्ष शिवसेनेला 12 जागा देण्याच्या मन:स्थितीत नाही. यावरुन मविआत ठिणगी पडल्याची चर्चा सुरु आहे.
महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही, 15 तास बसू पण तोडगा काढू
महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. 15 तास बसू पण तोडगा काढू असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली आता पवार साहेब यांना भेटायला आलो असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा वाद नसल्याचती माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Vidhansabha election : मोठी बातमी : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, पहिल्या यादीत 99 नावं, फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट