एक्स्प्लोर

Night Curfew | महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागणार, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील : आरोग्यमंत्री

रात्रीच्या संचारबंदीच्या (Night Curfew) केंद्राच्या सुचनेची अंमलबजावणी होणार आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती. केरळपाठोपाठ राज्यातही रात्रीची संचारबंदी.

Night Curfew : केंद्राने राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केल्यानंतर राज्यात अधिक काळजीची गरज असल्याचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. केरळमधील ओनम सणाच्या काळात झालेल्या कोरोना प्रादुर्भाव पाहता केंद्राच्या सुचनेची अंमलबाजावणी होईल, मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना दिली. 

टोपे म्हणाले, केरळ राज्यातील ओनम सणामुळे वाढलेला कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्राने राज्याला रात्रीच्या संचाबंदीची सूचना केलीय. आगामी काळात राज्यातील सणवार पाहता या बाबत काळजी घेण्याची गरज असून केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण नाहीत तिथे शाळा सुरू होऊ शकतात का याची चाचपणी करतोय. 5 तारखेपर्यंत सर्व शिक्षक आणि सबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राइव्ह घेण्यात येणार आहे, असेही टोपे यांनी सांगितले.

केरळमध्ये रात्र संचारबंदी
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात काही प्रमाणात घट आली असली तरी केरळात मात्र कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी राज्यात नवा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, केरळात रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे आदेश सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत. 

Night Curfew in Kerala : केरळात कोरोनाचं संकट गडद; मुख्यमंत्र्यांकडून 'नाईट कर्फ्यू'ची घोषणा


गेल्या 24 तासांत केरळात 31265 रुग्णांची नोंद
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी सांगितलं की, "कोरोना महामारीचा (Corona Pandemic) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात टेस्टिंग वाढवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शनिवारी केरळात 1,67,497 लोकांचे सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. त्यापैकी 31,265 लोकांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच 153 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे."

केंद्राच्या वतीन आधीच दिलेला इशारा 
गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाच्या 40 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद केली जात आहे. यापैकी जास्त रुग्णांची नोंद ही महाराष्ट्र आणि केरळात करण्यात येत आहे. यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाईट कर्फ्यू लावण्यावर विचार करण्यास सांगितलं होतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, केरळात अचानक कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याचं कारण काही दिवसांपूर्वी साजरा करण्यात आलेला ओनमचा सण आहे. 

महाराष्ट्रात काल (शनिवारी) 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 
राज्यात काल (शनिवारी) 4,831 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 455 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 59 हजार 906 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.02 टक्के आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget