Maharashtra Weather : 26 जानेवारीपर्यंत राज्यात कसे असेल हवामान, वाचा पुढच्या पाच दिवसाचा अंदाज एका क्लिकवर...
Maharashtra Weather : संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 5 दिवस (म्हणजे 26 जानेवारी पर्यंत) थंडी वाढणार नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold western) आहे तर कुठे ढगाळ वातावरण आहे. दरम्यान पुढील पाच दिवस राज्यात हवामानाची काय स्थिती राहील याबाबत ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao khule) यांनी माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 5 दिवस (म्हणजे 26 जानेवारी पर्यंत) थंडी वाढणार नाही. तसेच राज्यात कोणतीही गारपीट वा पावसाची (Rain) शक्यता जाणवत नसल्याचे खुळे यांनी सांगितले.
Weather Update : गारपीट किंवा पावसाची शक्यता नाही
पाऊस आणि गारपीटीच्या येणाऱ्या बातम्यामुळे द्राक्षे, कांदा आणि इतर पिके घेणारे महाराष्ट्रातील शेतकरी धास्तावले आहेत. मात्र, सद्या अशी कोणतीही स्थिती जाणवत नसल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे आवाहन खुळे यांनी केले आहे. सद्या काही जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत आहे.तर काही ठिकाणी तापमानात वाढ होत आहे.
Nort indian weather : उत्तर भारतातून येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव
सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या मध्यातून एका-पुढे- एक सरळ अश्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांच्या सध्या प्रणाली आहेत. हवेच्या या उच्च दाबाच्या अँटीसायक्लोन प्रणाल्यांच्या मध्यातून छेदून जाणाऱ्या पूर्व-पश्चिम रेषे('रीज' )मुळे उत्तर भारतातून थंडी घेऊन येणाऱ्या वाऱ्यांना अटकाव करते. एक पूर्व-पश्चिम हवेच्या उच्च दाबाची काल्पनिक भिंतच महाराष्ट्रात तयार झाली आहे, असेच समजावे अस खुळे म्हणाले. सध्या उत्तर भारतात जबरदस्त पाऊस, बर्फ, थंडी पडत असुनही आपल्याकडे पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेली जाणवत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात विशेष कडाक्याची थंडी सध्या जाणवत नाही. परंतु महाराष्ट्रात पुढे थंडीची आवर्तने येणारच असल्याचे खुळे म्हणाले.
Maharashtra wheather :27 जानेवारीनंतर पावसाचा अंदाज
पुढचे पाच दिवस जरी हवामानात बदल होणार नसला तरी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत राज्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यादरम्यान राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आधीच वाढत्या थंडीचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यात पुन्हा पाऊस आला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा होऊ शकतो.
संबंधित बातम्या























