एक्स्प्लोर

राज्यात हुडहुडी वाढणार! पुढील 10 दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज

महाराष्ट्रातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण तर कुठं थंडीचा कडाका जावत आहे.

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण तर कुठं थंडीचा कडाका जावत आहे. दरम्यान, फिंजल चक्रीवादळाने (Cyclone Finjal) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर, पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule)  यांनी दिली आहे.

पुढील 10 दिवस थंडी वाढणार

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस म्हणजे बुधवार दिनांक 18 डिसेंबर(संकष्टी चतुर्थी) पर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने  म्हणजे मंगळवार 10 डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही 

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्याच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार 10 डिसेंबरनंतर तिथेही वातावरण निवळेल असे खुळे म्हणाले. 

पुढील 10 दिवस कसं असेल तापमान?

पुढील 10 दिवसातील पहाटे 5 चे किमान व दुपारी 3  चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे  किमान 10 ते 12 तर कमाल 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते. दरम्यान, सध्या राज्यातील सर्वच ठिकाणी वातावरण बदल होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मागच्या दोन तीन दिवसापूर्वी राज्यातील काही भागात पावासनं देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. यामुळं शेतकरी चांगलेच धास्तावले होते. कारण हा पाऊस फळपिकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळं द्राक्ष, डाळिंब केळी उत्पादक शेतकरी चिंतेत होते. मात्र, सध्या राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं आहे. पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकारव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

शेतपिकांची काय काळजी घ्यावी? 

पुढील 10 दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या 10 दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असे खुळे म्हणाले. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. 
          

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget