Maharashtra Weather Forecast : राज्यात पावसाची शक्यता, काय आहे हवामान खात्याचा अंदाज? वाचा सविस्तर
Maharashtra Weather Update : मुंबईमध्ये मंगळवारी 33 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची आणि 28 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात पुढील तीन ते चार दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय हवामान (IMD) विभागानुसार मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानुसार अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानापासून सुटका मिळणार आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात 8 आणि 9 मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्येही उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या या संदर्भात काही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. दुसरीकडे महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे.
आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये हवामान कस असेल? जाणून घ्या
मुंबई
मुंबईत मंगळवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक समाधानकारक श्रेणीत 95 वर नोंदवला गेला आहे.
पुणे
पुण्यात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातही अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. पुण्यातील हवेचा दर्जा निर्देशांक मध्यम श्रेणीत 165 वर नोंदवला गेला.
नागपूर
नागपूरमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नागपुरातही ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. नागपुरातील हवेच्याची गुणवत्ता निर्देशांकाची 242 वर म्हणजेच अत्यंत वाईट श्रेणीत नोंदवण्यात आला आहे.
नाशिक
नाशिकमध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नाशिकमध्येही अंशतः ढगाळ वातावरण राहील. हवेचा दर्जा निर्देशांक 91 वर समाधानकारक श्रेणीत आहे.
औरंगाबाद
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथेही ढगाळ वातावरण राहणार आहे. हवेचा दर्जा निर्देशांक 'मध्यम' श्रेणीत 113 वर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :