Coronavirus Update : देशातील कोरोना संसर्गाचा वेग मंदावतोय, कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे नवे 2 हजार 288 रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : एकीकडे देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट झाली असून मृत्यू घटले आहेत. देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे नवे 2 हजार 288 रुग्णांची नोंद झाली असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत ही मोठी घट आहे. 919 रुग्णांची घट झाली आहे. आदल्या दिवशी 3207 कोरोनाबाधितांची नोंद आणि 29 जणांचा मृत्यू झाला होता.
कोरोनाबाधितांची आणि मृत्यूंची संख्या घटली
देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. देशात एकुण 4 कोटी 25 लाख 63 हजार 949 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 कोटी 31 लाख 7 हजार 689 झाली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 637 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबळींसह कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकुण संख्या 5 लाख 24 हजार 103 वर पोहोचली आहे.
#AmritMahotsav#Unite2FightCorona#LargestVaccineDrive
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) May 10, 2022
𝗖𝗢𝗩𝗜𝗗 𝗙𝗟𝗔𝗦𝗛https://t.co/EAEVREBccT pic.twitter.com/u4oYFzT5xQ
ठाण्यात 16 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातील ठाण्यात 16 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांसह महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 7 लाख 9 हजार 224 वर पोहोचली आहे.
12-14 वयोगटातील 3 कोटींहून अधिक मुलांना पहिला डोस
देशव्यापी कोरोना लसीकरणात 12-14 वयोगटातील तीन कोटींहून अधिक मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :