एक्स्प्लोर

राज्यात लवकरच नवीन वाहतूक दंड आकारणी, 'हे' नियम मोडल्यास कारवाई

Maharashtra Traffic Fines | राज्यात आता वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यास जबर दंड भरावा लागू शकतो. तसा प्रस्ताव राज्य परिवहन विभागाने सरकारला पाठवला असून सरकारची मंजूरी मिळाल्यानंतर नवी नियमावली लागू करण्यात येणार आहे.

मुंबई: गाडी चालवताना आता वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर आता तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. कारण राज्य परिवहन विभागाने आता वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यास भला मोठा दंड आकारण्याची तयारी सुरु केलीय.

राज्यात नागरिकांकडून परिवहन विभागाच्या वाहतूकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याचं दिसून येतंय. त्याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने नवीन दंडाची नियमावली तयार केली असून ती राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.

हौसेला मोल नाही! 39 लाखांची गाडी आणि 34 लाखांची नंबर प्लेट

बेस्ट बसमधून विना तिकीट प्रवास केल्यास 1200 रुपये दंडाची तरतूद नव्या प्रस्तावात करण्यात आली आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलत असल्यास दोन हजार रुपयांचा दंड लागणार आहे. गाडीची कागदपत्रे नसल्यास 200 ते 300 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसेच लायसन्स नसताना गाडी चालवल्यास 500 रुपयांचा दड भरावा लागणार आहे.

गाडीची पीयूसी नसल्यास दोन हजारांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. निशिध्द क्षेत्रात प्रवेश केल्यास पाच हजार रुपयांच्या दंडाची शिफारस करण्यात आली आहे. गाडी चालवत असताना मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर सुरु ठेवल्यास तो आता वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन समजून त्यावर आता दंड भरावा लागणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक किंवा माल वाहतूक करणे, सिग्नलचे नियम मोडणे, अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविणे अशा अनेक गोष्टींचाही त्यात समावेश आहे.

ॲाटो मोबाईल इंडस्ट्रीची कोरोनावर मात; आरटीओच्या तिजोरीत बक्कळ महसुलाची भर

राज्य परिवहन विभागाने जवळपास 150 गोष्टी अशा काढल्या आहेत ज्यांचं उल्लंघन केल्यास भला मोठा दंड आकारला जाऊ शकतो. राज्य परिवहन विभागाने या नव्या नियमावलीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला असून राज्य सरकारची याला मंजूरी मिळाल्यास राज्यात नवीन वाहतूक दंड प्रणाली लागू होणार आहे.

'या' आमदाराच्या गाडीवर वाहतूक पोलिसांची एकाच महिन्यात दोनदा कारवाई

पहा व्हिडीओ: Maharashtra Traffic Fines | राज्यात लवकरच नवीन दंड आकारणी; 'हे' नियम मोडल्यास कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी

मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले

विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार

गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025Gadchiroli Honey Bee : मधमाशांशी फ्रेंडशिप, घरात 8-10 पोळं, मधमाशांसोबत राहणारं कुटुंबNagpur Rada Update : दंगलीत सहभागी होण्यासाठीच आले होते 'ते' 24 आरोपी दंगलग्रस्त भागातले नाहीच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 

नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले

तांडा, वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी जेव्हा महाराष्ट्राच्या विधानभवनाला भेट देतात...

Embed widget