एक्स्प्लोर
Advertisement
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल, अद्याप पावसाने जोर धरण्याची प्रतीक्षा, कोकणात मात्र पावसाची दांडी
मोठ्या प्रतीक्षेनंतर कोकणसह महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सून दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसात मान्सून विदर्भ आणि मराठवाड्यातही दाखल झाला आहे.
मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर कोकणसह महाराष्ट्राच्या विविध भागात मान्सून दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवसात मान्सून विदर्भ आणि मराठवाड्यातही दाखल झाला आहे. परंतु पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे लोक पावसाने जोर धरण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान कोकणात पावसाने हजेरी लावली खरी, परंतु गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मराठवाड्यातील हिंगोली, बीड, उस्मानाबादनंतर काल रात्री पावसाने औरंगाबादेतदेखील हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम सस्वरुपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस रात्रभर सुरु होता. आकाश पूर्ण ढगांनी व्यापलेले होते. आज (रविवार) सकाळपासून आकाश पूर्ण ढगांनी व्यापलेले आहे. त्यामुळे औरंगाबादेत आजही जोरदार पाऊस बरसेल अशी आशा आहे. दरम्यान, आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोपरगाव तालुक्यात तळं ओव्हर फ्लो झाल्यानं पावसाचं पाणी घरात | एबीपी माझा
पावसासाठी सामुदायिक नमाज पठण
संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याफार प्रमाणात पावसाने हजेरी लावली असली तरी म्हणावा तसा पाऊस अद्याप झालेला नाही. जून महिना संपत आला असला तरी पावसाने ओढ दिल्याचे चित्र सर्वत्र आहे आणि त्यामुळे सोलापुरात मुस्लिम बांधवातर्फे सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोलापुरातील अहले हदीस रंगभवन ईदगाह येथे विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. साश्रू नयनांनी मुस्लिम बांधवांनी पावसासाठी याचना केली.
सोलापुरात पावसासाठी शेकडो मुस्लिम बांधवांचं अल्लाहला साकडं | एबीपी माझा
विदर्भ पावसाच्या प्रतीक्षेत
विदर्भाच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने याबाबत अधिकृत माहिती जाहीर केली आहे. मात्र अद्यापही म्हणावा तसा जोर पावसानं धरलेला नाही. काही अपवाद वगळले तर अनेक जिल्ह्यात तुकड्या-तुकड्यांमध्ये पावसाची सर येते. फक्त ढगांची गर्दी होत आहे, त्यामुळे मान्सून आला असला तरी त्याने अजून जोर धरावा अशी आशा व्यक्त केली जात आहे. मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात दाखल झाला. चंद्रपुरात मात्र चांगला पाऊस झाला आहे.
अहमदनगरात मुसळधार पाऊस
नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातल्या ब्राम्हणगावात शनिवारी किमान दोन ते तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे ब्राम्हणगावचे गावतळे भरुन गावच्या दिशेने वाहू लागले आहेत. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे गावकऱ्यांच्या घरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी लोकांच्या घरांमधील भांडी, टीव्ही, पलंग, कपडे, कोंबड्यांची खुराडी, फार्म हाऊसमधील वस्तू वाहून गेल्या. अनेक दुकांनांमधील मालाचे नुकसान झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement