एक्स्प्लोर

राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन आजपासून

आजपासून राज्य विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन, यंदा प्रश्नोत्तराचा तास नाही, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सतराशे जणांच्या कोरोना चाचण्या

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होईल. यंदा प्रश्नोत्तरांचा तास व लक्षवेधी या अधिवेशनात नसेल. हे पावसाळी अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या अधिवेशनासाठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडेल, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.

गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत

पावसाळी अधिवेशनच्या तोंडावर विधानसभा अध्यक्षांसह अनेक मंत्री आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सरकार पुढे हे अधिवेशन दोन दिवस चालवण्याचे आव्हान आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि दोन दिवस एकाच ठिकाणी महाराष्ट्रातून येणारे आमदार आणि त्यांचे पीए, अधिकारी या गर्दीत अधिवेशन पार पाडण्याची कसरत सरकारला करावी लागणार आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबईत दोन दिवसांचे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच तेच अधिवेशनाला येता येणार आहे. राज्यात आतापर्यंत साधारणपणे 35 हून अधिक आमदार, मंत्र्याना कोरोनाची बाधा झाली. त्यातून काही बरे झाले तर काहींवर उपचार सुरू आहेत.

VIDEO | #Coronavirus विधिमंडळातील 37 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

अधिवेशनासाठी सरकारकडून खास उपाययोजना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पावसाळी अधिवेशनासाठी सभागृहतील बैठक व्यवस्थाही बदलली आहे. एका सदस्यानंतर दोघांची जागा सोडली जाणार आहे. त्यामुळे काही जणांना प्रेक्षक गॅलरीत देखील बसवले जाईल. तसेच अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या शरीराचे तापमान प्रवेशद्वारावरच मोजण्यात येणार आहे. विधानभवनात जागोजागी र्निजतुकीकरण यंत्रे बसवण्यात आली आहेत.

अंतर नियमांचे पालन केले जावे, यासाठी सर्वत्र सुरक्षारक्षक तैनात राहणार आहेत. आमदार आणि मंत्री यांना फक्त एकच पीए हा विधिमंडळात बरोबर आणण्याची परवानगी दिलेली आहे. लोकप्रतिनिधींच्या स्टाफच्या जेवणाची सोय देखील विधी मंडळाच्या बाहेर करण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोरोनाच्या पार्शवभूमीवर होणारे अधिवेशन हे जितके आव्हानात्मक आहे तितकेच ते वेगळे ठरणार आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधित झालेले लोकप्रतिनिधी

विधानसभा अध्यक्ष : नाना पटोले

मकरंद पाटील - राष्ट्रवादी किशोर जोरगेवार - अपक्ष ऋतुराज पाटील - काँग्रेस प्रकाश सुर्वे - शिवसेना पंकज भोयर - भाजप माणिकराव कोकाटे - राष्ट्रवादी मुक्ता टिळक - भाजप वैभव नाईक शिवसेना सुनील टिंगरे - राष्ट्रवादी किशोर पाटील - शिवसेना यशवंत माने - राष्ट्रवादी मेघना बोर्डीकर - भाजप सुरेश खाडे - भाजप सुधीर गाडगीळ - भाजप चंद्रकांत जाधव - काँग्रेस रवी राणा - अपक्ष अतुल बेनके - राष्ट्रवादी प्रकाश आवाडे - अपक्ष अभिमन्यू पवार - भाजप माधव जळगावकर - काँग्रेस कालिदास कोलंबकर - भाजप महेश लांडगे - भाजप मोहन हंबरडे - काँग्रेस अमरनाथ राजूरकर - काँग्रेस मंगेश चव्हाण - भाजप गीता जैन - सरोज अहिरे -

मंत्री

जितेंद्र आव्हाड - राष्ट्रवादी असलं शेख - काँग्रेस अशोक चव्हाण - काँग्रेस धनंजय मुंडे - राष्ट्रवादी संजय बनसोडे - राष्ट्रवादी अब्दुल सत्तर - शिवसेना सुनील केदार - काँग्रेस बाळासाहेब पाटील - राष्ट्रवादी

विधान परिषद

सदाभाऊ खोत - भाजप सुजित सिंग ठाकूर - भाजप गिरीश व्यास - भाजप नरेंद्र दराडे - भाजप

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Washim Crime News: प्रियकराशी लग्न करण्यासाठी आजीच्याच दागिन्यांवर डल्ला; एका महिन्यांनंतर वाशिममधील नातीसह तरुणाला पिंपरी-चिंचवडमधून अटक
प्रियकराशी लग्न करण्यासाठी आजीच्याच दागिन्यांवर डल्ला; एका महिन्यांनंतर वाशिममधील नातीसह तरुणाला पिंपरी-चिंचवडमधून अटक
Sanjay Raut: आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result LIVE:
Gokul Election Result LIVE: "तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?" मतदाराने नेत्यांना फटकारलं; गोकुळ निवडणुकीच्या मतपेटीत सापडली चिठ्ठी!
Sanjay Raut: आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
आधी बाबा सिद्दीकी, सलमान खानवर फायरिंग, प्रदीप पुर्णेकरांची हत्या अन् आता टायगर श्रॉफवर गोळीवर; फडणवीस अन् अमित शाहांना घेरलं, संजय राऊतांनी मागचं सगळंच काढलं
Rana Suryavanshi Attack Baramati Crime: मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
मुंबईत टायगर श्रॉफवर हल्ला झाला त्याचवेळी महाराष्ट्रातील तरुण उद्योजक मृत्यूच्या दाढेतून वाचला, बारामतीत नेमकं काय घडलं?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Gokul Election Result LIVE: गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग? सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने महायुतीचा घाम फोडला?
Tiger Shroff Car Firing Marathi News: पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
पानिपतचा मूळ रहिवाशी, डंकी रुटने अमेरिकेत पोहोचला; टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला घडवून आणणारा अनिल पंडीत नेमका कोण?
Satara Politics: पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं; शिवसेनेच्या नाराजीनंतर भाजपमध्येही आलबेल नसल्याची चर्चा? नेत्यांची अनुपस्थिती अन् बोलणे टाळलं, नेमकं काय घडलं?
Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
टायगर श्रॉफवर हल्ला केल्यानंतर शुटर्सनी काय केलं, स्टार्ट टू एंड चोख प्लॅनिंग, लोकल ट्रेनचा वापर, नेमकं काय घडलं?
Jalgaon Accident News: जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
जळगावच्या बांभोरी उड्डाणपुलावर कार-कंटेनरची भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, नातेवाईकाला सोडण्यासाठी गेले अन्..., नात्यातील तिघांचा दुर्दैवी अंत
Embed widget