School Bus Fare : पालकांच्या खिशाला महागाईचा चटका; स्कूल बस शुल्कात वाढ करण्याचा निर्णय
Maharashtra School Bus Fare Increase: पुढील शैक्षणिक वर्षांपासून राज्यातील स्कूल बसच्या शुल्कात दरवाढ होणार आहे. त्यामुळे पालकांना महागाई झळ अधिक बसणार आहे.
School Bus Fare Hike: आधीच महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता दुसरीकडे पालकांना आणखी झळ बसणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात (School Bus Fees) मोठी वाढ होणार आहे. स्कूल बस असोसिएशनने दरवाढीचा निर्णय घेतला असून 15 ते 20 टक्के दरवाढ होणार आहे.
मागील काही महिन्यांपासून स्कूल बस चालक-मालकांना इंधन दरवाढ (Fuel Price Hike) आणि इतर कारणांचा मोठा फटका बसला होता. मागील वर्षी वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बस (School Bus) शुल्कात वाढ केली होती. आत, पु्न्हा एकदा 1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होणार आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या या निर्णयामुळे आता पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.
दरवाढीसाठी कोणती कारणे?
केंद्र सरकारने नवं स्क्रॅपिंग धोरण आखले आहे. त्याचा फटका स्कूल बस चालकांना बसणार आहे. त्याशिवाय, बस गाड्यांच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ, वाहनांचे स्पेअर पार्ट्स, टायर आणि बॅटरीच्या दरात देखील 12 ते 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बसचा एकूण देखभालीचा खर्च वाढला आहे. सोबतच दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत वाढ होत असल्यानं इंधनाच्या खर्चात देखील वाढ झाली असल्याकडे असोसिएशनने लक्ष वेधलं आहे.
त्याशिवाय, बसेसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात देखील वाढ झाली आहे. अशात शुल्क वाढ करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं स्कूल बस असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना महासाथीच्या काळात दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने स्कूल बस गाड्या वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. बस वाहतूक ठप्प असल्याने देखभाल खर्च वाढला होता. एका बाजूला कोणतेही उत्पन्न नसताना दुसरीकडे बसच्या देखभालीचा आर्थिक भार बस मालकांना सहन करावा लागत होता.
राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस महाराष्ट्रात तर मुंबईत सुद्धा साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत. साधारपणे सध्या प्रति विद्यार्थी 1500 किमान शुल्क आहे. स्कूल बसच्या दरवाढीमुळे पालकांना मोठा भुर्दंड बसणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI