जबरदस्त! सांगलीच्या सातवी पास पठ्ठ्याने 30 हजारात बनवली FORD 1930 मॉडेलची गाडी
FORD 1930 : देवराष्ट्रेच्या दत्ताभाऊच्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीत आणखी एका गाडीची चर्चा... सांगलीत एका मिस्त्रीने 30 हजारात बनवली सेम टू सेम FORD 1930 मॉडेलची गाडी
FORD 1930 : देवराष्ट्रेच्या दत्ता लोहार यांनी बनवलेल्या मिनी जिप्सी पाठोपाठ सांगलीतील आणखी एक ब्रिटिशकालीन फोर्ट गाडी चर्चेत आली आहे. ही गाडी बनवलीय सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकने. होय! हे खरं आहे. दता लोहार यांच्याप्रमाणे अशोक आवटी यांनी देखील भंगारातील एमएटी आणि रिक्षाचे साहित्य वापरून, जुगाड करत ही 1930 सालची ही फोर्ट गाडीची हुबेहूब गाडी बनवलीय. अशोक आवटी यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या ते सांगली-कर्नाळ रोडवरील गॅरेजचे चालक आहेत...
काकानगर मध्ये टू व्हीलर गाड्या व ट्रॅक्टर दुरुस्तीचं गॅरेज असलेल्या अशोक यांनी केवळ आपल्या कल्पकता आणि 2019 ला सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात you tube वर चे व्हिडिओ पाहून एक घरात एक चार चाकी गाडी मुलाना खेळण्यासाठी असावी याचे स्वप्न पाहिले. आज अडीच वर्षानंतर अशोक आवटीचे स्वप्न प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलय ते या फोर्ट गाडीच्या रुपात.. रिक्षा प्रमाने हँड किक वर सुरु होणारी ही गाडी प्रेटोल वर चालते...30 किमी इतका मायलेज देते .
सेम टू सेम FORD 1930 मॉडेलची प्रतिकृती!!, अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्तीचा छंद जडला. गॅरेज थाटले. गाड्या दुरूस्त करता-करता अनेक वस्तू, मशीन खोलाखोलीचा नाद लागला. वेगवेगळ्या गाड्या माॅडिफाय केल्या. याचं पार्ट त्याला त्याचं याला, अशी उसाबर केली. चांगलं आणि वेगळं बनवायचा प्रयत्न केला. आता चारचाकी गाडी बनवायचं मनावर घेतलं आणि दोन वर्षे खपून पठ्ठ्यानं गाडी तयार केलीही. भंगारातील एमएटी गाडीचं इंजिन आणि रिक्षाचे हब आणि आणखी काही पार्टचा जुगाड कररून आणि लोखंडी पत्रा आणि अँगल पासून ही १९३० ची अलिशान FORD साकार झाली आहे. फक्त तीस हजार खर्च आला आहे. गाडीला led लाइट आहेत, इंडिकेटर , हॉर्न अशी ही सेम टू सेम फोर्ड गाडी आहे असे वाटत. वजन जवळपास 100 किलो इतके आहे आणि 3 ते 4 जण सहजरित्या या गाडीने जाऊ शकतात.
अतिशय संघर्षातून आणि सातत्याने कष्ट आणि पदरमोड करून अशोक यांनी या गाडीची निर्मिती केली आहे. अशोक यांना पहिल्यापासून सतत नावीन्यपूर्ण काहीतरी करायचं वेड होतं त्यातूनच या या गाडीचे अशोक यांना निर्मिती केले असं अशोक यांचे भाऊ आई आणि पत्नी सांगते.