Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain Update : उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबई : काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
कोकणात काय स्थिती असणार?
कोकणात 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडूनवर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचाअंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्याला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा काय अंदाज?
मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारीकरण्यात आला आहे. म्हणजे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतचा पाऊस हवामान विभागाकडून वर्तवण्यातआला आहे. तिकडे, लातूर आणि उस्मानाबादसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजे, ह्या दोन्ही जिल्ह्यात काहीठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाची काय परिस्थिती?
मध्य महाराष्ट्रात 31 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने उत्तर मध्य महाराष्ट्रातसर्वत्र पाऊस बघायला मिळू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. ज्यात 15 मिमी ते 64 मिमीपर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे. उद्या नाशिकसाठी मात्र आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यताआहे.
विदर्भात पाऊस-पाणी कसं असेल?
विदर्भात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण विदर्भासाठीआज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे