Sanjay Raut : काहीही झालं तरी झुकायचं नाही हे ठरवलेलं, संजय राऊतांनी सांगितला ईडीच्या अटकेनंतरचा अनुभव
Sanjay Raut : एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
Sanjay Raut : ईडीने (ED) मला जेव्हा अटक केली तेव्हा मी घरच्यांचे चेहरे पाहत होतो. ज्यावेळी मला आर्थर रोड जेलमध्ये नेलं त्यावेळी आमदार सुनिल राऊत (Sunil Raut) यांना हुंदका फुटल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. काहीही झालं तरी झुकायचे नाही असं आमच्या घरी ठरलं होतं. प्रतिमेला धक्का लागेल असे कोणतही कृत्य करायचे नाही असं ठरवल्याचे संजय राऊत म्हणाले. मला खात्री आणि विश्वास होता की मी लवकर बाहेर येईल असे राऊत म्हणाले. ईडीच्या कोणत्याही कारवाईत अटक झालेला तीन महिन्यात बाहेर आलेला मी एकमेव माणूस असल्याचे राऊत म्हणाले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाकट्ट्याचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात संजय राऊत आणि सुनिल राऊत या दोन बंधुंशी संवाद साधण्यात आला त्यावेळी त्यांनी विविध मुद्दे मांडले.
महाराष्ट्रातील संवाद संपला आहे. सध्या व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत. मी राजकीय भूमिका मांडतो. मी व्यक्तिगत हल्ले कधी करत नाही. आठ ते नऊ वर्षात राज्यातील वातावरण गढूळ झालं असल्याचे संजय राऊत म्हणाले.
अटकेच्या आदल्या दिवशी एका नेत्याचा मला फोन
ईडीने ज्या दिवशी मला अटक केली, त्याच्या आदल्या दिवशी एका नेत्याचा मला फोन आला होता. आपण गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलू असे ते मला म्हणाल्याचे संजय राऊत म्हणाले. पण मी त्यास नकार दिल्याचे संजय राऊत म्हणाले. दबावाला बळी पडून अनेकजण शिवसेना सोडून गेले आहेत. पण मी दबावाला बळी पडलो नसल्याचे राऊत म्हणाले. आमच्या रक्तात शिवसेना असल्याचे राऊत म्हणाले. सगळे गेले तरी चालतील आम्ही पक्षात एकटे राहू पण शिवसेना सोडणार नाही. शिवसेना ही महाराष्ट्राची आणि आमची भावनिक गरज असल्याचे राऊत म्हणाले.
गेलेले परत येणार असतील तर मी विरोध करणार
पक्ष सोडून गेलेले परत येणार असतील तर त्यांना मी विरोध करेन असे संजय राऊत म्हणाले. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना सगळे काही मिळले होते. तरी ते पक्ष सोडून गेल्याचे राऊत म्हणाले. पक्ष सोडण्याला आमचा विरोध नाही. पण शिवसेना ही आमचीच म्हणणं चुकीचं असल्याचे संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :