Majha Katta: उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा काय भावना होती? राज ठाकरेंच्या मातोश्री म्हणतात...
Raj Thackeray Mother: उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्यानंतरची भावना राज ठाकरे यांच्य मातोश्री कुंदा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्या महाकट्ट्यावर बोलत होत्या
Majha Katta : उद्धव (Uddhav Thackeray) चार वर्षाचा होता तेव्हा माझे लग्न झाले होते. तो माझा बहिणीचा मुलगा असं कधीच वाटले नाही. ज्यादिवशी त्याचे मुख्यमंत्रीपद गेले त्यादिवशी वाईट वाटले, अशा शब्दात राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे (Raj Thackeray Mother) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाकट्ट्यानिमित्त (Majha Katta) आयोजित केलेल्या कट्ट्यात त्या बोलत होत्या.
राज ठाकरे यांच्या आई कुंदाताई ठाकरे पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आल्या आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या आईसोबचा कट्टा त्यांच्याच घरी एबीपी माझाचा महाकट्टा रंगला होता. त्यावेळी त्यांनी शालेय जीवनातले किस्से, कॉलेजमध्ये असताना केलेल्या करमाती, अशी सगळी गुपितं आज उलगडली.
शिवतीर्थावर ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने मुख्यमंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला संपूर्ण राज ठाकरे कुटुंबीय शिवतीर्थावर उपस्थित होते. शपथविधीनंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी, कुंदा ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. उद्धव ठाकरेही यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले होते. "मुख्यमंत्रीपद जावे असे कधीच वाटले नाही. ज्यावेळी मुख्यमंत्रीपद गेले त्यावेळी अतिशय वाटले", असे त्या म्हणाल्या.
राज यांच्या आई या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या धाकट्या भगिनी आहेत. त्यामुळे कुंदा ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काकू-पुतण्या आणि मावशी-भाचा असं दुहेरी नातं आहे.
राज ठाकरे यांच्या आईंनीही जुन्या आठणींना उजाळा दिला. राज ठाकरे यांच्या प्रगती पुस्तकावर बाळासाहेब सही करायचे. राज शाळेत असताना शुक्रवारी बाळासाहेब त्याला घ्यायला गाडी पाठवत होते. शनिवार आणि रविवार राज ‘मातोश्री’वरच असायचा. शनिवारची शाळा तर त्याने कधी बघितलीच नाही. तेव्हा शनिवारी सकाळची शाळा असायची, बाळासाहेब म्हणायचे एवढ्या सकाळी कोणी शाळेत जातं का? मुळात तो लहान असताना बाळासाहेबांनी त्याचे लाड केले