थोरात-तांबे कुटुंबातल्या संघर्षाची ही नांदी म्हणायची? तांबे पिता-पुत्रांच्या खेळीनं काँग्रेसची नाचक्की, थोरातांनाही धक्का!
काँग्रेसचं अधिकृत तिकीट मिळूनही पित्यानं आपल्या मुलासाठी माघार कशी घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पित्याकडून पुत्राकडे आमदारकी गेली..पण या सत्तांतरात भल्याभल्यांचा गेम झालाय.
Maharashtra Political news : विधानपरिषद निवडणुकीत नेमका कुणी कुणाचा गेम केला. नाशिकमध्ये थोरात तांबे यांच्या संघर्षाला सुरुवात यानिमित्तानं झालीय का, काँग्रेसचं अधिकृत तिकीट मिळूनही पित्यानं आपल्या मुलासाठी माघार कशी घेतली. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एका पित्याकडून पुत्राकडे आमदारकी गेली..पण या सत्तांतरात भल्याभल्यांचा गेम झालाय. एका राष्ट्रीय पक्षाची जाहीर नाचक्की, कौटुंबिक कलहाची ठिणगी आणि भाजपच्या भविष्यातल्या गेम प्लॅनची चुणूक असं सगळं नाट्य यात दडलेलं आहे. यातलं नाट्य समजून घेण्यासाठी आधी संगमनेरचं राजकीय मैदान नीट समजून घेणं आवश्यक आहे.
विधानपरिषेदत पितापुत्रांनी कुणाचा गेम केला?
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सत्यजित तांबे यांचे मामा
सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर विधानपरिषेदतून तीन वेळा आमदार
यावेळी उमेदवार सुधीर असणार की सत्यजित याची चर्चा सुरु होती
सत्यजित यांच्याऐवजी सुधीर तांबेंनाच उमेदवारी हा बाळासाहेब थोरातांचा निर्णय होता
पण राजकीय मतदारसंघ नसल्यानं राजकीय प्रवेशासाठी धडपडणाऱ्या सत्यजित तांबेंना विधानपरिषदेत एक संधी दिसत होती.
स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांची आज जयंती आणि आजच राष्ट्रीय युवा दिनही. त्याच मुहूर्तावर सत्यजित तांबे यांनी आपल्या मामांना शह देत राजकारणाचा श्रीगणेशा केलाय.
काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरायला सुधीर आणि सत्यजित तांबे एकत्रित गेले तेव्हा सगळ्यांना वाटलं विषय संपला असावा. पण तिथे एकत्रित जाऊन सुधीर तांबे यांनी पक्षाचा अर्ज न भरणं आणि सत्यजितनं अर्ज भरणं यात बरंच राजकारण दडलंय.
विधानपरिषदेच्या राजकारणात कुणाचा गेम
जर सत्यजित तांबे अपक्ष फॉर्म भरल्यानंतर आपण काँग्रेसचाच कार्यकर्ता असं म्हणतायत, तर पक्षानं आधीच त्यांना अधिकृत उमेदवार का जाहीर केलं नाही
सुधीर तांबे यांना आपल्या मुलासाठी माघारच घ्यायची होती तर त्यांनी काँग्रेसचा दुसरा उमेदवार रिंगणात येणारच नाही याची खबरदारी घेतली का
महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार असं सत्यजित स्वत:च जाहीर करत आहेत, पण काँग्रेससह इतर पक्षांची याला मान्यता होती का?
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विधानसभेवर नऊ वेळा निवडून आले आहेत. आताही राजकीय वारसा म्हणून त्यांची कन्या पुढे येण्याची शक्यता आहे. या स्थितीत सत्यजित तांबे यांनी आपल्या मामांनाच शह काटशह दिल्याचं दिसतंय.या निवडणुकीत भाजपनं आपला उमेदवारच न देणं यातही फडणवीसांच्या भविष्यातल्या प्लॅनची चुणूक पाहायला मिळतेय.
इतर महत्त्वाची बातमी: