Kishori Pednekar : केतकी चितळेच्या आजाराबाबत सगळ्यांनाच माहिती, यामागे कर्ता-करविता वेगळाच! किशोरी पेडणेकरांचा आरोप कोणावर?
Kishori Pednekar : केतकी चितळेच्या कृत्यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय.
Kishori Pednekar : सध्या अभिनेत्री केतकी चितळेनी (Ketaki Chitale) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक झाली आहे. या आधी केतकी तिला असेलल्या एका आजारामुळे चर्चेत आली होती. आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केतकीच्या कृत्याचा निषेध व्यक्त करत तिच्या आजाराविषयी टीका केली आहे, त्याच बरोबर यामागे कर्ता करविता कोणी वेगळाच असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच काल झालेली देवेंद्र फडणवीस यांची सभा व इतर राजकीय घडामोडींवर भाष्य कर विरोधकांवर निशाणा साधला आहे.
या विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये : किशोरी पेडणेकर
केतकी चितळे पोस्ट प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला आहे, त्या म्हणाल्या केतकी चितळेबाबत बोलायचं झालं तर तिच्या आजारपणाचं सगळ्यांनाच माहिती आहे. तिच्या या कृत्यामागे कर्ता करविता वेगळा आहे. शरद पवारांबद्दल जी टीका केली. ज्याचे समर्थन सदाभाऊ खोत तुम्ही करताय? तुमचं वय काय आहे ? त्यात त्यापेक्षा राजकारणात किती वय आहे हे बघावं. या विकृत प्रवृत्तीचं समर्थन करू नये असा सल्ला पेडणेकरांनी दिला आहे.
मुंबई पेक्षा पुणे नागपूरमध्ये भ्रष्टाचार नाही का? फडणवीसांना सवाल
काल देवेंद्र फडणवीस यांच्या सभेबाबत किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे, मुंबईची काळजी तुम्ही करु नका, मुंबई पेक्षा पुणे नागपूर बघा तिथे भ्रष्टाचार नाही का? बीएमसीत भाजपचा भगवा झेंडा कधीच फडकवला जाणार नाही. त्यांची वानरसेना आहे, पण राम आमचा आहे, उद्धवजी यांनी लाफटर शो कधीच केला नाही, तुमचं वजन तुम्ही कबूल केलं, मेट्रो मॅन जर देवेंद्र फडणवीस असतील तर त्यामध्ये पापांचे सुद्धा धनी व्हा. आपण जबाबदारीने वागा !
"अमृता फडणवीसांना आम्ही सिरिअसली घेत नाही"
आज अमृता फडणवीसांनी केलेल्या ट्विटबाबत किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय, त्या म्हणाल्या देवेंद्र यांना वाटेल काय चाललंय माझ्या बायकोचं? त्यांना चर्चेत राहण्याची सवय आहे. प्रत्येक जण आपल्या कर्मांने वजन वाढवत असतो. याला आम्ही सिरीयसली घेत नाही. असं पेडणेकर म्हणाल्या.
वज़नदार ने हल्के को,
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया ... #Maharashtra
राजकारणातली फारशी समज नितेश राणेंना नाही
मुंबई तुंबणार का? असा सवाल नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला होता. त्यावर महापौरांनी थेट उत्तर दिलंय, त्या म्हणाल्या, राजकारणात अपरिपवक्तता वाढत चाललीये. मात्र नितेश त्यांना फारशी समज दिसत नाही. महाराष्ट्रच्या मुख्यमंत्री यांना थेट तुम्ही प्रश्न विचारण्यापेक्षा आयुक्तांना प्रश्न विचारा. थेट पत्र पाठवून पब्लिसिटी करून घेताय, आयुक्तांना मर्जीत ठेवायचं, काम करून घ्यायचं आणि यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचं. प्रत्येकला टीआरपी हवं आहे असं किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.
सदाभाऊ खोत यांच्याकडून केतकी चितळेचं समर्थनं
आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. केतकीचा मला अभिमान आहे, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी तिचं समर्थनं केलं आहे. केतकी चितळेनं शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर तिच्या अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. यानंतर तिला अटक करण्यात आली असून सध्या ती पोलिस कोठडीत आहे. सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे की, केतकी कणखर आहे तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली, असं ते म्हणाले. स्वतःवर टीका केली की सगळे आठवते. सरकार पुरस्कृत आतंकवाद राज्यात वाढवता का? असा सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती. अमोल मिटकरी ब्राम्हण समाजाला टार्गेट करताच त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का? असंही खोत म्हणाले.
संबंधित बातम्या :