Eknath Khadse : असंवेदनशील मंत्री आणि सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात, एकनाथ खडसेंची राज्य सरकारवर टीका
Eknath Khadse criticised Shinde government : एकनाथ खडसेंनी म्हटलंय, आनंदशिधा वाटपाची शासनाने घोषणा केली, मात्र त्याच्या वाटपातही घोळ सुरु आहे, तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार असल्याचे सुरु आहे.
Eknath Khadse criticised Shinde Government : असंवेदनशील मंत्री अन् सरकारमुळे शेतकऱ्यांसोबत गोरगरीबांची दिवाळी अंधारात असल्याची टीका एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) राज्य सरकारवर केली आहे. एकनाथ खडसे हे जळगावात (Jalgaon) त्यांच्या निवासस्थानी आले होते, यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यंदा शेतकऱ्यांची , गोरगरीबांची दिवाळी अंधारात - एकनाथ खडसे
एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलंय, आनंदशिधा वाटपाची शासनाने घोषणा केली, मात्र त्याच्या वाटपातही घोळ सुरु आहे, तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार असल्याचे सुरु आहे, अनेक गोरगरीबांना आनंदशिधा मिळालेली नाही, एकीकडे लाभ द्यायचा म्हणता, आणि दुसरीकडे तो लाभ मिळू नये अशी व्यवस्था सरकारने केलेली दिसते, अशी टीका एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर केली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळालेला नाही, तर दुसरीकडे अतिवृष्टी झालेली असतांना कृषीमंत्री कुठे अतिवृष्टी झाली असे वक्तव्य करतात त्यामुळे मंत्र्यांना, सरकारला कुठलीही संवदेनशीलता नाही, आणि यामुळे यंदा शेतकऱ्यांची , गोरगरीबांची दिवाळी अंधारात असल्याचं सांगत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे.
जिल्हा दूध संघांच्या चौकशीवरुन पोलिसांच्या कारभारावर नाराजी
जळगाव जिल्हा दूध संघात पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पोलिसांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे, पोलीस हे जिल्हा दूध संघातील चोरीची चौकशी करताहेत की, संपूर्ण पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करत आहे, हे कळत नाहीये. मात्र ट्रकभर लागो की, दहा ट्रक कागदपत्रे लागो ती आम्ही द्यायला तयार आहे असे मत एकनाथ खडसे व्यक्त केले आहे. खडसे म्हणाले, आम्ही जी तक्रार त्याचा गुन्हा दाखल केलेला नाही, असे असतांनाही पोलीस चौकशी करत आहे, याबाबत राजकीय दबावातून पोलीस छळ करत आहे, न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी आम्ही दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळे न्यायालयाचा अवमान केला म्हणून पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.
गुलाबराव पाटलांचे हे वक्तव्य अत्यंत दुर्देवी - एकनाथ खडसे
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आकाशातून पाणी देऊ का? असं वादग्रस्त वक्तव्य केल असून हे वक्तव्य अत्यंत दुर्देवी असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. गुलाबराव पाटील हे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आहेत. माहिती घेऊ, काहीतरी मार्ग काढू तसेच नागरिकांना दिलासा देण्यासारखं मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलायला हवं होते, असे म्हणत एकनाथ खडसेंनी मंत्री गुलाबराव पाटील यांना टोला लगावला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
ISRO Satellites Launched : इस्रोने पुन्हा इतिहास रचला, बाहुबली रॉकेट LVM3 चे व्यावसायिक प्रक्षेपण यशस्वी