एक्स्प्लोर

Sambhajiraje Chhatrapati : मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेत असं घडलं नसतं: संभाजीराजे छत्रपती 

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये असं घडलं नसतं, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड करून 35 पेक्षा जास्त शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. पण जर मला उमेदवारी शिवसेनेने दिली असती तर आज शिवसेनेचे अशी अवस्था झाली नसती असे मत छत्रपती संभाजीराजे आणि व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आज विश्रांतवाडीमध्ये पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं स्वागत केलं. यावेळी ते एबीपी माझाशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांची खदखद आताची नसून पूर्वीपासूनच

अहमदनगरमध्ये बोलतानाही त्यांनी या विषयावर भाष्य केलं होतं. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे यांची खदखद ही आताची नसून पूर्वीपासूनच होती. त्याचा स्फोट फक्त आज झाला असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. जे चाललंय ते तुम्हीही बघत आहात मीही बघतोय, काय निर्णय येतो बघू. सरकार कुणाचेही असावे पण ते चांगलं चालावं आमचं एवढंच मत आहे, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. अहमदनगरच्या गुंडेगाव येथे प्रवेशद्वाराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

त्यांनी म्हटलं की, ज्यावेळी मराठा समाजाचे आरक्षण गेलं, त्यावेळी बऱ्याच लोकांना वाटत होतं महाराष्ट्रात दंगल व्हावी, पण मी समाजाचं हित पाहिलं, मी कुणाच्या बरोबर आहे हे न बघता त्या स्टेजवर गेलो समाजाला शांत केलं. मी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनाचे काम केले. बहुजन समाजाच्या हितासाठी काम केलं. मात्र, जेंव्हा मी महाविकास आघाडी सरकारला सांगितले की, मला पुरस्कृत खासदार करा तेंव्हा तिथे वेगवेगळे पक्ष आले, आघाड्या आल्या पण मी केलेलं काम त्यापुढे शून्य झालं, अशी खदखद संभाजीराजे छत्रपती यांनी बोलून दाखवली. 

इतर महत्वाच्या बातम्या

शिंदेंसोबत शिवसेनेचे नेमके आमदार किती? शिंदे म्हणतात 40 तर कुणी म्हणतंय 33, कुणी म्हणतंय 35... 

महाराष्ट्रावर वार! एकनाथ शिंदेंच्या मानगुटीवर बसून भाजप 'ऑपरेशन कमळ' घडवतंय; सामनातून हल्लाबोल 

महाराष्ट्रातील राजकीय भूकंपामागे गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा मोठा हात; कोण आहेत CR पाटील?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकलं, सोयाबिन खरेदी देशात महाराष्ट्र अव्वल; शेतकऱ्यांना 2 दिवसांत पैसे मिळणार
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
Video: अंजली दमानियांनी घेतली अजित पवारांची भेट; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दिली माहिती, उद्या दुपारी 12 वाजता
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Embed widget