Maharashtra Supreme Court Hearing Live : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही
Maharashtra Political Crisis Live : कोर्टाच्या निकालापूर्वीच निवडणूक आयोगाला सत्तासंघर्षावर निर्णय घेता येणार का? आज घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीत उत्तर मिळण्याची शक्यता
LIVE
![Maharashtra Supreme Court Hearing Live : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही Maharashtra Supreme Court Hearing Live : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/21/df0e446c34227763a936cc930164844e_original.jpg)
Background
Maharashtra Political Crisis Live : राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तापरिवर्तनाबाबत आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण कुणाचा?, याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार की केंद्रीय निवडणूक आयोगात याकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर दुसरी सुनावणी होतेय. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आलाय, त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातल्या प्रश्नांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयोगाकडून निर्णय होऊ नये ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. तर आयोगाला यावर निर्णय घेऊ द्यावा अशी शिंदे गटाची मागणी आहे. याशिवाय आमदारांची अपात्रता आणि सरकारच्या वैधतेला दिलेलं आव्हान याबाबतच्या याचिकांवरही सुनावणी अपेक्षित आहे.
राज्य सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा,राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय उपेक्षित आहे.
'या' याचिकांवर होणार सुनावणी
शिंदे गटाची याचिका - उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची याचिका
शिवसेनेची याचिका - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा याचिका.
आयोगाची लढाई जिंकण्यासाठी आमची लढाई पूर्ण; शिवसेना नेते अनिल देसाईंची माहिती
Maharashtra Politics : आयोगाची लढाई जिंकण्यासाठी आमची लढाई पूर्ण झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.
सुप्रिम कोर्टात केस सुरू राहणार ; अरविंद सावंत यांची माहिती
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी या पुढे देखील सुप्रिम कोर्टात केस सुरू राहणार असल्याची माहिती दिली.
Maharashtra Politics : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही
Maharashtra Politics : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
एकनाथ शिंदे पक्षातच नाही मग निवडणूक आगोय त्यांचं म्हणंणं कसं ऐकणार? कपिल सिब्बल यांचा प्रश्न
पक्षाचा व्हिप न पाळल्याने आमदार अपात्र आहेत. शिवाय एकनाथ शिंदे पक्षातच नाही मग निवडणूक आगोय त्यांचं म्हणंणं कसं ऐकणार असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केलाय.
एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं प्रथामिक सदस्यत्व देखील नाही; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
19 जुलै पूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं प्रथामिक सदस्यत्व देखील नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यानी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)