Supriya Sule : महाराष्ट्रानं निवडून दिलं, आसाममध्ये काय करताय? सुप्रिया सुळेंचा बंडखोर आमदारांवर निशाणा
आसाममध्ये पूर आला आहे. मला वाटलं तिथं मदत करायला आमदार गेले आहेत, परंतू तिथं जाऊन ते पंचतारांकित हॉटेलमध्ये रहात आहेत. असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदारांवर टीका केली.
Supriya Sule on Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आसाममध्ये गेलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. आसाममध्ये पूर आला आहे. मला वाटलं तिथं मदत करायला आमदार गेले आहेत, परंतू तिथं जाऊन ते पंचतारांकित हॉटेलमध्ये रहात असल्याचे म्हणत सुळे यांनी आमदारांवर टीका केली. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा आमदारांनी तिथल्या लोकांना जाऊन मदत करावी असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्रानं निवडून दिलं ते आसाममध्ये काय करतायेत
आसाममध्ये गेलेल्या आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलं आहे. ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदारसंघातील कामं कोण करणार? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून करोडो रुपयांची बिल चालली आहेत, हे योग्य आहे का? असेही त्या म्हणाल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीबद्दल देखील सुळे यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी इंदापूर आणि बारामतीत काय चाललं आहे हे मी सांगू शकते. बाकीचे काय करतात हे मी कसं सांगू शकते असे म्हणत प्रश्नाला बगल दिली.
पेरणीच्या काळात तुम्ही मतदारसंघात नको का?
सरकार हे सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असते. पण दुर्दैव आहे की, ज्या विश्वासानं महाराष्ट्रातील जनतेनं त्या आमदारांनी निवडून दिलं आहे. आसाममध्ये मोठा पूर आला आहे. मला वाटलं तिथं पूर आल्यामुळं तिथं ते मदत करण्यासाठी गेले आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा तेथील जनतेची सेवा करा असेही सुळे म्हणाल्या. तुम्हाला महाराष्ट्रातील जनतेनं निवडून दिलं आहे. आसाममध्ये काय करताय. महाराष्ट्रातील काम कोण करणार. सध्या पेरणीचा काळ सुरु आहे. पेरणीच्या काळात तुम्ही मतदारसंघात नको असा सवाल सुळे यांनी केला. लोक आरोप करत राहतात. आम्हाला आमच्या मतदारसंघात खूप जबाबदाऱ्या आहेत. आम्हाला बाकी काही बोलण्यात, कोण काय बोलतेय हे ऐकण्यास वेळ नसल्याचे सुळे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या: