एक्स्प्लोर

Shahaji Patil : सगळं ठरलंय! फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे उपमुख्यमंत्री, तर आम्हाला... शिवसेनेच्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं आहे.

Shahaji Patil : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे. जवळपास 7 मंत्र्यांसह 40 आमदारांनी बंड केलं आहे. गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सांगोला तालुक्याचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये त्यांनी सगळं ठरलंय, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं. रफीक शेख असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. शहाजी पाटील नेमकं काय म्हणालेत ते पाहुयात...

काय झाडी, काय डोंगार, सगळं ओके

शहाजी पाटील हे सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार आहेत. ते सध्या एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहटीमध्ये आहेत. त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये एका कार्यकर्त्याने फोन करुन आपण कुठे असल्याची विचारणा केली. यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, मी गुवाहटीत आहे. इकडं काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं ओके आहे. कोणाला फोन करु नका असा नेत्यांचा आदेश होता. त्यामुळं फोन केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

हा माणूस बोलत नाही पण रिझल्ट

एकनाथ शिंदे जास्त बोलत नाहीत पण त्यांचे रिझल्ट करेक्ट आहेत. मला हे नेतृत्व खूप आवडलं आहे. आपवी ओळख नाही पाळख नाही तरीपण त्यांनी माझी विचारपूस केल्याचं शहाजी पाटील यांनी सांगितलं. तुम्ही गणपतराव देशमुख यांच्या मतदारसंघातून निवडून आले आहेत, तुम्ही काही पण काम सांगा असे शिंदे म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितलं. 

 उद्धव ठाकरे देव माणूस

एकही आमदार उद्धव साहेबांच्या विरोधात नाही. त्यांना देव माणूस मानत आहे असेही सांगायला शहाजी पाटील विसरले नाहीत. पुढच्या अडीच वर्षात तालुक्याचा ऐतिहासीक विकास होणार आहे. तुम्ही बघत राहा फक्त. पण हे सांगत असताना गेल्या अडीच वर्षातमध्ये सांगोला उपसा सिंचन योजनेला नाव आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्या, अशा मागणीची बारा पत्र दिली असतानाही नाव दिले नसल्याची तीव्र नाराजी शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. त्यामुळं एकीकडं उद्धव ठाकरेचं कोडकौतुक सांगोल्याचे आमदार करीत असले तरी दुसरीकडे मात्र त्यांच्या मनात मतदारसंघाच्या निमित्तानं एक प्रकारची नाराजी पक्षनेतृत्वावर दिसून येत आहे.

प्रथम शंभूराज देसाई आणि मी दोघेच गेलो

सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आपणास सभागृहात बोलू दिले नाही, याबाबतची नाराजीही शिवसेनेबद्दल यावेळी शहाजी पाटील यांनी व्यक्त केली. आपण योग्य निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये शंभूराज देसाई आणि मी आम्ही दोघे पहिल्यांदा गेलो मग बाकीचे आमदार आले असाही खुलासाही यावेळी पाटील यांनी केला. तसेच तीन दिवस झाले आपण गुवाहाटीमध्ये आहे. त्यामुळं तालुक्यात काय घडते आहे, यासाठी तुम्हाला फोन केला असल्याची कबुलीही यावेळी पाटील यांनी दिली. हे पाटील यांचे कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget