एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis : सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटात हालचाली? 37 आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवले

Shiv Sena MLA Full List With Eknath Shinde : गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर 37 शिवसेना आमदारांच्या सह्या आहेत.

Shiv Sena MLA Full List With Eknath Shinde : गटनेतेपदी आपणच आहोत हे सांगण्यासाठी शिंदे गटाकडून नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर 37 शिवसेना आमदारांच्या सह्या आहेत. मागील दोन दिवसात दुसऱ्यांदा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. बुधवारी पाठवलेल्या प्रस्तावात 34 आमदारांच्या सह्या होत्या.. त्यात नितीन देशमुख यांच्या सही बाबत वाद होता. आता नव्याने 37 आमदारांच्या सह्याचं पत्र पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय 9 अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे. हे पत्र विधानसभा सचिव, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवण्यात आले आहे.  

एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलंय. भरत गोगावलेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत. असं पत्र एकनाथ शिंदेंनी लिहिलंय. आता काही वेळापुर्वी 12 आमदारांना कारवाई करण्याचं पत्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी पुन्हा पत्र लिहित भरत गोगावलेच आमचे प्रतोद आहेत असं म्हटलंय. त्यामुळे एकनाथ  शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचल्याचं दिसून येतंय. एकनाथ शिंदेंना नेते पदावरुन काढणारे दादा भुसेच आता शिंदे गटात दाखल. शिंदेंना नेते पदावरुन काढण्याच्या पत्रावर दादा भुसेंनीही सही केली होती.  

Maharashtra Political Crisis : सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटात हालचाली? 37 आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवले

Maharashtra Political Crisis : सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटात हालचाली? 37 आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवले

Maharashtra Political Crisis : सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटात हालचाली? 37 आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवले

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA With Eknath Shinde)
1)  एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
2) अनिल बाबर (Anil Babar)
3)  शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai)
4)  महेश शिंदे (Mahesh Shinde)
5) शहाजी पाटील  (Shahaji Patil)
6) महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)
7) भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale)
8) महेंद्र दळवी (Mahendra Dalawi)
9) प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar)
10) डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar)
11) ज्ञानराज चौगुले (Dyanraj Chaugule)
12) प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare)
13) तानाजी सावंत (Tanaji Sawant)
14) संदीपान भुमरे (sandipan Bhumare)
15) अब्दुल सत्तार नबी (Abdul Sattar)
16) प्रकाश सुर्वे (prakash surve)
17) बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)
18) संजय शिरसाट  (Sanjay Shirsat)
19) प्रदीप जयस्वाल (Pradip Jayswal)
20) संजय रायमुलकर (sanjay Raymulkar)
21) संजय गायकवाड  (Sanjay Gaikwad)
22) विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir)
23) शांताराम मोरे (Shantaram More)
24) श्रीनिवास वनगा (shrinivas Wanga)
25) किशोरअप्पा पाटील (Kishor Patil)
26) सुहास कांदे (Suhas Kande)
27) चिमणआबा पाटील (Chiman Aaba Patil)
28) सौ. लता सोनावणे (Lata Sonawane)
29) प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)
30) सौ. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
31) योगेश कदम (Yogesh Kadam)
32) गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
33) मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar)
34) सदा सरवणकर (Sada Sarvankar)
35) दीपक केसरकर(Dipak Kesarkar)
36) दादा भुसे (Dada Bhuse)
37 ) संजय राठोड (Sanjay Rathod)

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवलेय. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलेय. खासदार अरविंद सावंत म्हणाले की, जे काही आकडे दाखवले जात आहेत ते चुकीचे आहेत. आम्ही दोन बैठका घेतल्या. नवनिर्वाचित गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद यांनी व्हीप जारी केला होता. काही जणांनी त्यास उत्तर दिले आहे, मात्र यात काही खोटी कारणं पण आहेत. त्यांच्या हिशोबानं त्यांनी उत्तरं दिली आहेत.  शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून 12 जणांची नावे दिली आहेत. त्यांचे सदस्य रद्द करावेत अशी मागणी केली आहे. 

कोण आहेत ही 12 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?  
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) संदीपान भुमरे 
4) प्रकाश सुर्वे 
5) तानाजी सावंत 
6) महेश शिंदे 
7) अनिल बाबर 
8) यामिनी जाधव 
9) संजय शिरसाट 
10) भरत गोगावले 
11) बालाजी किणीकर 
12) लता सोनावणे

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी आमदारांवरील कारवाईनंतर ट्विट करत प्रत्युत्तर दिलेय. आपल्या ट्वीटनंतर ते म्हणाले की, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा  मकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget