Maharashtra Petrol-Diesel Price : राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर जारी; सर्वाधिक किमती कोणत्या शहरात?
Maharashtra Petrol-Diesel Price Today : देशासह राज्यातही गेल्या 75 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.
Maharashtra Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी दोन महिन्यांहून अधिक काळापासून इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. महाराष्ट्रात अद्यापही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. आजही तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. राष्ट्रीय स्तरावर गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. आज देशात सलग 75 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊया मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरांतील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती...
केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती :
प्रमुख शहरं | पेट्रोलची किंमत प्रति लिटर | डिझेलची किंमत प्रति लिटर |
मुंबई | 109.98 रुपये प्रति लिटर | 94.14 रुपये प्रति लिटर |
ठाणे | 110.12 रुपये प्रति लिटर | 94.28 रुपये प्रति लिटर |
पुणे | 109.72 रुपये प्रति लिटर | 92.50 रुपये प्रति लिटर |
नाशिक | 109.79 रुपये प्रति लिटर | 92.57 रुपये प्रति लिटर |
नागपूर | 110.10 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
कोल्हापूर | 109.66 रुपये प्रति लिटर | 92.48 रुपये प्रति लिटर |
अहमदनगर | 110.12 रुपये प्रति लिटर | 92.90 रुपये प्रति लिटर |
अमरावती | 111.14 रुपये प्रति लिटर | 93.90 रुपये प्रति लिटर |
केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा