एक्स्प्लोर

Pandharpur by-Election 2021 : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी 38 उमेदवारांनी दाखल केले 44 अर्ज , दोन्ही बाजूने बंडखोरीला उधाण

Pandharpur by-Election 2021 : सध्या भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. याशिवाय निर्णायक ठरू शकणाऱ्या धनगर उमेदवारांची उमेदवारीही दोन्ही पक्षांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे.


पंढरपूर : भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी एकूण 38 जणांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही बाजूने बंडखोरीला उधाण आले आहे. भाजपला काल याची मोठी लागण झाली असून परिचारक गटाचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी दाखल करत दे धक्का केला आहे. 

काल नगराध्यक्षा भाजप उमेदवाराच्या कार्यक्रमात असताना पती नागेश भोसले बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करत होते. नागेश भोसले यांच्या बंडखोरीमुळे पंढरपूर शहर व परिसरात भाजपाला धक्का बसू शकतो. तर भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनीही घरातूनच बंडखोरी करत भाजपाला आव्हान दिल्याने मंगळवेढ्यात भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुतासारखं सरळ करायला निवडणूक लढवत आहे: अभिजित बिचुकले 
 
राष्ट्रवादीलाही असाच फटका  बसला असून त्यांच्या मित्रपक्षातून बंडखोरी झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केली असून पक्षाने सचिन पाटील यांना पक्षाचा AB फॉर्म दिल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला  जातो. भारत भालके हे पहिली निवडणूक स्वाभिमानीकडून लढून विजयी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात मोठी ताकद असून राजू शेट्टी प्रचारासाठी तळ ठोकून थांबणार असल्याने राष्ट्रवादीला हे बंड वरिष्ठ पातळीवरून शांत करणे गरजेचे बनले आहे. 

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजपकडून उमेदवारांची घोषणा; तरुण नेतृत्त्वांवर पक्षश्रेष्ठींचा विश्वास

शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी कायम ठेवत प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता शिवसेनेने त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. शैला गोडसे या गेल्या 10 वर्षे महिला व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलने करत आल्या असून महिलावर्गात त्या लोकप्रिय आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेत त्या सदस्य असून कार्यकर्ते व मतदारांच्या दबावामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत हि निवडणूक लढवणार असल्याची त्यांची भूमिका आहे. 

पंढरपूर पोटनिवडणूक; समाधान अवताडेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची फौज येणार

सध्या भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणे हे मोठे आव्हान ठरणार असून याच्याशिवाय निर्णायक ठरू शकणाऱ्या धनगर उमेदवारांची उमेदवारीही दोन्ही पक्षांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे. या उमेदवारात सातारा येथील अभिजित बिचकुले यांचेसह इंदापूर, सोलापूर, करमाळा, पुणे अशा मतदारसंघाशी संबंध नसलेल्याही अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget