Maharashtra Gram Panchayat Election Results 2022 LIVE: ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Gram Panchayat Election Result LIVE: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Gram Panchayat Election Result LIVE: शिवसेनेतील फूट आणि राज्यांतील सत्तांतरानंतर प्रथमच होणाऱ्या ग्रामपंचायत निकालात शिंदे आणि ठाकरे गटांत सामना पाहायला मिळतोय. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीच्या निकालात शिंदे गटानं बाजी मारल्याचं चित्रं आहे. तर तिकडे सोलापूरात चिंचपूर ग्रामपंचायतीच्या निकालात ठाकरे गटाला विजय मिळालाय. तिथं ठाकरे गटानं ७ पैकी ७ जागांवर विजय मिळवून भाजपला धक्का दिला. तर औरंगाबादमध्ये सिल्लोड तालुक्यात दोन ग्रामपंचायती जिंकून शिंदे गटानं मुसंडी मारलीय.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रत्येक अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Grampanachayat Election : नाशिक : येवला तालुक्यातील चारही ग्रामपंचायतीचा संमिश्र निकाल
Grampanachayat Election : येवला (Yeola Taluka) तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचे निवडणुकीचे निकाल हाती आले असून त्यामध्ये दोन ठिकाणी राष्ट्रवादी तर एका ठिकाणी भाजप तर एका ग्रामपंचायत तर एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सत्ता आली असून तालुक्यातील चिचोंडी, बुद्रुक, चिचोंडी खुर्द, गवंडगाव, रस्ते सुरेगाव अशा चार ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती. या चारही ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले असून दोन ठिकाणी राष्ट्रवादी एका ग्रामपंचायतीवर भाजपा व एका ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता काबीज केली आहे.
पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.
पुणे जिल्हा 19 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला आहे.
राष्ट्रवादी-9
भाजप - 3
शिवसेना -2 ( शिंदे गट)
स्थानिक आघाडी- 4
महाविकास आघाडी- 1
























