(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra News : मुंबई पालिकेकडून राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस
मुंबई महापालिकेकडून राणा दांपत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या सात दिवसांत नोटीसीचे उत्तर द्या, असे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
Navneet Rana : राणा दाम्पत्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई पालिकेकडून नवनीत राणा यांच्या घराला पुन्हा नोटीस देण्यात आला आहे. घराचं अवैध बांधकाम का तोडू नये, असा सवाल राणा दाम्पत्याला पालिकेने केला आहे.
खार परिसरात लाव्ही इमारतीच्या आठव्या मजल्यावर रवी राणा यांचा फ्लॅट आहे. रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. याच वाढीव बांधकामावर मुंबई महापालिकेने आक्षेप घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून राणा दांपत्यास कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. पुढच्या सात दिवसांत नोटीसीचे उत्तर द्या, असे मुंबई महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.
महापालिका पथकाच्या तपासणीत एकूण राणा दांपत्याच्या घरी 10 ठिकाणी नियमांचं उल्लंघन आढळलं आहे. नियमांचं उल्लंघन का केलं?, मंजूर आराखड्याशिवाय अधिकचं बांधकाम करतांना परवानगी घेतली का याची समाधानकारक उत्तरे येत्या सात दिवसांत येणे अपेक्षित आहे.
मुंबई महापालिकेचं पथकाने 4 मे रोजी रवी राणा यांच्या खारमधील घराची पाहणी केली. या पाहणीत रवी राणा यांनी त्यांच्या घरात मंजूर आराखड्याच्या व्यतिरिक्त काही अंतर्गत बदल केले आहे. या घराची बाल्कनी वाढवली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांच्या नावे ही नोटिस पाठवण्यात आली आहे. आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत रवी राणा तुरुंगात असताना राणा दाम्पत्याच्या घरावर नोटीस चिकटवली होती.
संबंधित बातम्या :
मुंबई पोलीस राणा दाम्पत्याला चौकशीसाठी नोटीस जारी करण्याची शक्यता : सूत्र
राणा दांपत्याला कोर्टाकडून नोटीस जारी, जामीन का रद्द करू नये? 18 मेपर्यंत न्यायालयाने मागितले उत्तर