Navneet Rana : अभिनेत्री ते अमरावतीच्या खासदार 'असा' आहे नवनीत राणांचा प्रवास
Navneet Rana : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधी म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करणाऱ्या नवनीत राणांनी मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर खासदार नवनीत राणा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 2014 साली आपल्या राजकीय करिअरला सुरूवात केली आहे. सर्वसामान्य माणसांशी आपुलकीने बोलणे आणि घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत करणे या कारणांमुळे खासदार राणा या मध्यमवर्गीयांचे नेहमीच जवळच्या खासदार बनल्या.
अभिनेत्री म्हणून करिअरला सुरुवात
नवनीत राणांचा जन्म मुंबईत झाला. बारावीनंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि मॉडलिंगला सुरूवात केली. त्यानंतर त्यांना चित्रपटाची ऑफर मिळाली. नवनीत राणांनी आतापर्यंच कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. नवनत राणा मराठी, पंजाबी, हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषा येतात.
आमदार रवी राणांशी विवाह
नवनीत राणा या बाबा रामदेव यांच्या शिष्या आहेत. बाबा रामदेव यांच्याकडे नेहेमी जात असताना त्यांची भेट बाबा रामदेव यांचे शिष्य असणाऱ्या बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी झाली. बाबा रामदेव यांच्या आशीर्वादाने नवनीत कौर आणि आमदार रवी राणा यांनी लग्न करण्याचे ठरविले. 2011 साली आमदार रवी राणा यांच्याशी यांच्याशी लग्नगाठ बांधली. नवनीत राणा यांचा विवाह सोहळा देखील खास होता. अमरावतीत 2,100 जोडप्यांसह सामूहिक विवाहात दांपत्य जीवनाला सुरुवात केली. या विवाहसोहळ्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते.
लग्नानंतर चित्रपटांना अलविदा
नवनीत राणा यांना 2014 साली पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरवले. त्या निवडणुकीत नवनीत यांचा पराभव झाला मात्र त्यांनी जनसंपर्क कायम ठेवला. 019 मध्ये पुन्हा आपली पत्नी नवनीत राणा यांच्याकरिता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळवून नवनीत यांना खासदार बनवून लोकसभेत पाठवले. मात्र लोकसभेत जाताच त्यांनी पुन्हा केंद्रातील सत्ताधारी भाजपला जवळ केले. नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा पराभव केले.
नवनीत राणा गेल्या वर्षी मार्च महिन्यात चर्चेत आले. जेव्हा त्या संसदेत मास्क घालून आल्या. कोरोना काळात मास्कविषयी त्यांनी जनजागृती केली. तसेच संसदेत खासदारांचा स्क्रिनींगला जोर दिला.
राज्यात हनुमान चालीसाचं पठण सुरू झाल्यावर राणा दांपत्य यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मातोश्री मध्ये हनुमान चालीसा वाचण्याचा आवाहन दिलं. जर वाचली नाही तर आम्ही मातोश्रीवर येऊन बाहेर बसून हनुमान चालीसा पठण करणार असं आवाहन दिलं. त्यानुसार आज राणा दांपत्य मुंबईत दाखल झाले असून उद्या मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार पण पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली त्यामुळे आता राणा दांपत्य काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :
Rana VS Shivsena : राणा दाम्पत्याने पोलिसांना गुंगारा देत 'अशी' गाठली मुंबई !
Ravi Rana Political Career : व्यावसायिक ते राजकारणी.. आमदार रवी राणा यांची कारकीर्द