Nashik News : मुंबईच्या धर्तीवर नाशिकचं ट्रॅफिक कंट्रोल, नाशिक पोलिसांचा नवा प्लॅन काय?
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील कोंडी फोडण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नवा प्लॅन तयार केला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील कोंडी फोडण्यासाठी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नवा प्लॅन तयार केला असून मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) धरतीवर नाशिक शहरातलं वाहतुकीचे नियंत्रण केल्या जाणार आहे. त्यासाठी नाशिक शहरातले वाहतूक पोलीस (Nashik Traffic) शाखेतील जवळपास 50 पोलीस कर्मचारी मुंबई शहरात (Mumbai City) प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर नाशिकमधील वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक कोंडी फोडली जाणार असल्याचे नाशिक पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला (Traffic Jam) सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे नाशिककर या वाहतूक कोंडीला त्रासले आहेत. याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईक नवरे यांनी वेगळं पाऊल उचलले. मुंबई पोलिसांची कार्यपद्धती अवलंबली जाणार आहे. त्यासाठी येत्या 15 ते 20 दिवसात नाशिक पोलीस कर्मचारी मुंबईला जाणार असून पोलीस आयुक्त नाईक नवरे यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील प्लेन कटिंग रोखल्यानंतर आता नाशिक पुणे महामार्गावरील अंमलबजावणी सुरू झाली. दीड महिन्यांपूर्वी पोलीस महापालिका आरटीओ या संस्थांनी एकत्रित शहराच्या वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली होती. त्यावेळी मुंबई नाका सिग्नल अरुंद करून इंदिरानगर बोगदा गेट स्वतंत्र करणे तसेच वाहतूक कोंडीच्या ठिकाणी लहान पूल करावेत अशा सूचना पोलीस आयुक्तांनी केल्या होत्या. मात्र सर्व उत्सवात आणि नंतरही शहरात सर्वत्र होणारी वाहतूक कोंडी गंभीर वळणावर पोचअसून त्यात सुधारणा करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
नाशिक शहरातल्या द्वारका, मुंबई नाका, माइको सर्कल, सारडा सर्कल, गंगापूर नाका अशा वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या वाहतूक कोंडी बघायला मिळते. जिथे रस्ते मोठे आहेत, तरी देखील वाहतुकीचा कोळंबा का होतो हा प्रश्न सर्वच नाशिककरांना पडलेला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीतून नाशिककरांची सुटका करावी कारण सकाळ-सायंकाळ नाशिककर यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. गुन्हेगारी कमी होत नाही, किमान नाशिक शहरातील वाहतूक तरी सुरळीत ठेवा, अशी ज्यावेळेस मागणी नाशिक करण्यात येऊ लागली, त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तांनी या संदर्भातील घोषणा केलेली असून लवकरच नाशिकचे पोलीस मुंबईला जातील. मुंबई मधील वाहतुकीचे एवढी प्रचंड गर्दी असताना देखील, तिथे वाहतूक सुरळीत कशी असते. मुंबई शहरात अनेकदा व्हीआयपी मोमेंट्सजास्त असतात, तिथे रस्त्यांची काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. तरी देखील अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत नाही. त्या पार्श्वभूमीवर तिथलं वाहतूक नियंत्रण कसे केले जाते? याचा अभ्यास करण्यासाठी नाशिकच्या 50 पोलिसांना मुंबईत पाठवण्यात येणार असून ज्यावेळेस हे 50 पोलीस परत नाशिकमध्ये ते इतर आपल्या सहकाऱ्यांना त्याबाबत प्रशिक्षण देतील. त्याचबरोबर वाहतूक नियंत्रण आणण्यासाठी पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये व्यवस्थित एक कृती आराखडा तयार केला जाणार आहेत. त्यामुळे नाशिककरांना या अभ्यास गटांकडून काही दिलासा मिळतो का हे पाहणे तेवढंच महत्त्वाच ठरणार आहे.