एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : नाशिकच्या पालक मंत्रीपदी पुन्हा छगन भुजबळ? दादा भुसेंसह भाजप आमदारांची धाकधूक वाढली! 

Nashik Politics : आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची सूत्रे पुन्हा छगन भुजबळांकडे जाणार अशा चर्चाना उधाण आले आहे. 

Nashik Politics : अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनेक आमदार राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्याने नाशिक जिल्ह्यातही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) समर्थपणे सांभाळत असताना विद्यमान पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना या पदाची लॉटरी लागली. आता भुजबळांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्याने ते देखील पालकमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड काल अवघ्या महाराष्ट्राने (Maharashtra Politics) पाहिली. सर्वांचेच डोळे विस्फारले. राष्ट्रवादी फुटून अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथ घेतली. त्यांच्याबरोबर छगन भुजबळ यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता नाशिक (Nashik) जिल्ह्याला दोन मंत्री पदे मिळाल्याने भाजपमधील (BJP) काही आमदारांची धाकधूकही या राजकीय घडामोडींनी वाढवली आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. याचा प्रत्यय राज्यातील एकूणच राजकारणांवरून येत आहे. सर्वसामान्यांच्या ध्यानी मध्ये नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी विद्यमान सरकारशी हात मिळवणी करत रविवारी मंत्रीपदाची शपथ ही घेतली. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री व नाशिकमधील जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता नाशिकच्या पालकमंत्री पदाची सूत्रे पुन्हा छगन भुजबळांकडे जाणार अशा चर्चाना उधाण आले आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात छगन भुजबळ पालकमंत्री असताना त्यांच्यात आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात निधी वाटपावरून चांगलाच वाद रंगला होता. भुजबळाने आमचा निधी पळवल्याचा कांदे यांचा आरोप होता, हा वाद विकोपाला गेला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक दादा भुसे पालकमंत्री असून गेल्याच आठवड्यात निधी वाटपावरून भुजबळ यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता. त्यामुळे भुजबळ आणि भुसे यांच्यात देखील वादाची ठिणगी पडली आहे. आता नवीन राजकीय समीकरणात भुजबळांचं भुसे आणि कांदे एकाच सरकारमध्ये सामील झाल्याने  निधी वाटपावरून उडालेल्या खरा जंगीच्या रूपांतर दिलजमाइत होणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

'हे' आमदार अजित पवारांसोबत... 

माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांचे खंदे समर्थक असून त्यांची आमदारकीची चौथी टर्म आहे. 1999 साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत पहिल्यांदा आमदार झाले. राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेले नरहरी झिरवाळ तर पहिल्यापासून चर्चेत आहेत. अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते पहाटेच्या शपथविधीला देखील हजर होते. तर आता ते 2020 पासून विधानसभा उपाध्यक्ष सांभाळत आहेत. त्यानंतर दिलीप बनकर हे देखील राष्ट्रवादी पक्षाचे महत्वाचे नेते आहेत. त्यांनी जवळपास वीस वर्षांपासून पिंपळगाव बाजार समितीचे सभापती भूषवत आहेत. तसेच कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार तर सुरवातीपासूनच अजित पवार यांच्यासोबत आहेत. अजित पवार यांच्या अनेक कार्यक्रमांना ते हजर राहत आले आहेत. नाशिकमधील राष्ट्रवादीच्या बहुचर्चित आमदार सरोज आहिरे या देखील अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांना वडिलांसमान मानणाऱ्या अहिरेंनी देखील अजित पवार यांची साथ दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget