एक्स्प्लोर

लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास

Nitesh Rane Profile :नितेश राणे 2005 मध्ये लंडनमधून भारतात परत आले, त्याच वेळी नारायण राणे हे शिवसेनेत बंड करून बाहेर पडले होते.

सिंधुदुर्ग : आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना यंदा मंत्रिपदाचा बहुमान मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा (Ministry Expanse) विस्तार आज संपन्न झाला. त्यामध्ये, भाजपमधील 19 मंत्र्यांनी शपथ घेतली असून कणकवली मतदारसंघाचे आमदार आणि खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांना देखील संधी मिळाली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांची ही आमदारकीची तिसरी टर्म आहे, त्यामुळे त्यांना तिसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यामुळे, त्यांचा जीवनप्रवास, राजकीय वळणे आणि शिक्षण याबाबतचा घटनाक्रम या लेखातून जाणून घेऊयात. 

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि नीलम राणे यांच्या घरी 23 जून 1982 साली नितेश यांचा जन्म झाला. नारायण राणेंचं आयुष्यच मुंबईत गेल्यामुळे मूळ कोकणचे असलेल्या नितेश राणेंचं बालपण देखील मुंबईतच गेलं. मुंबईतील चेंबूर येथील स्वामी विवेकानंद हायस्कुलमध्ये त्यांनी इयत्ता 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, पदवीधर शिक्षण पूर्ण होताच ते पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले.  आपलं MBA पर्यंतचे शिक्षण त्यांनी लंडनमध्ये पूर्ण केले आहे. त्यामुळे, फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फॉरेन रिटर्न मंत्री म्हणून त्यांचा लौकिक होऊ शकतो. घरातून राजकीय बाळकडू मिळाल्याने नितेश राणेंनी परदेशातून शिक्षण घेऊन आल्यानंतरही राजकीय जीवनातच करिअरची वाट धरली. त्यामध्ये, पत्नी ऋतुजा नितेश राणे यांनी देखील त्यांच्या प्रत्येक निर्णयाला खंबीर साथ दिली. नितेश राणे यांना एक मुलगा असून त्याचे नाव निमिष नितेश राणे आहे. 

नितेश राणे 2005 मध्ये लंडनमधून भारतात परत आले, त्याच वेळी नारायण राणे हे शिवसेनेत बंड करून बाहेर पडले होते. त्यामुळे, वडिलांच्या राजकीय नव्या वाटेला साथ देत राजकीय जीवनातून त्यांनी नव्याने सुरुवात केली. त्यानुसार, 2006 साली नारायण राणे यांच्या नेतृत्वात स्वाभिमान संघटनेची स्थापना करण्यात आली. या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून राज्यभर सामाजिक कार्य उभारण्यात आणि जनसंपर्क ठेवण्याचं काम त्यांनी केलं.  2009 मध्ये मुंबई पालिकेवर भव्य मोर्चा काढून आपल्या ताकदीची सर्वांना दखल घ्यायला नितेश राणे यांनी भाग पाडलं. त्यामुळे, नारायण राणेंचा मुलगा ही ओळख जपत नितेश राणे यांनी स्वत:ची नवी ओळख निर्माण केली. 
 
स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून 2011 साली घेतलेल्या रोजगार मेळाव्यात एकाच दिवशी 25 हजार 300 लोकांना नोकरीं देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. वेळोवेळी विविध विषय मुद्दे घेऊन आंदोलने उभारली. स्वाभिमान संघटना राज्यभर वाढवली. मात्र, नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 2014 साली काँग्रेस पक्षातून कणकवली विधानसभेतून ते पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर, 2015-16 मराठा आरक्षणसाठी राज्यभर दौरे करून विशेष भूमिका बजावली. मात्र राजकीय स्थित्यंतरे बदलल्यानंतर 2019 साली नितेश राणे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  सन 2019 मध्ये भाजपातर्फे दुसऱ्यांदा कणकवली विधानसभेतून ते दुसऱ्यांदा आमदार झाले.  त्यानंतर, 2022-23- राज्यभर हिंदू जन आक्रोश मोर्चे काढून हिंदुत्वाचा महाराष्ट्रातील बुलंद आवाज अशी ओळख निर्माण करण्यात त्यांना यश आलं. तर, भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा बनून ते पुढे आले. नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या वेळी ते आमदार बनले आहेत. दोनवेळा भाजपकडून कणकवली विधानसभेतून आमदारपदी विजयी झाल्यानंतर यंदा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. 

हेही वाचा

मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
Sanjay Savkare Profile : चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी
Sanjay Savkare Profile : चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?
Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
Chandrakant Patil : गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
Embed widget