Sanjay Savkare Profile : चारवेळा आमदार, जळगावचे पालकमंत्री अन् आता संजय सावकारेंवर मंत्रिपदाची जबाबदारी
Sanjay Savkare Profile : संजय सावकारे हे भुसावळ विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
Sanjay Savkare Profile : महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) शपथविधी आज पार पडला. यात 39 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपकडून (BJP) भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे (Bhusawal Vidhan Sabha Constituency) आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) यांना मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय सावकारे यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात त्यांची राजकीय कारकीर्द...
संजय सावकारे यांचा जन्म 11 डिसेंबर 1969 रोजी भुसावळ (जि. जळगाव) येथे झाला. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केला आहे. त्यांनी एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तर तीन वेळा भाजपमधून आमदार झाले आहेत. तर या आधी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी भूषवले आहे.
संजय सावकारे चार वेळेस आमदार
संजय सावकारे यांनी 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत बाजी मारत ते पहिल्यांदा आमदार झाले. 2014 साली संजय सावकारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात भाजपाचे संजय सावकारे हेच विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना एकूण 87818 मते मिळाली होती. तर 2019 च्या निवडणुकीत देखील भाजपाचे संजय सावकारे विजयी झाले होते. त्यांना एकूण 81689 मते मिळत त्यांच्या मतांची टक्केवारी 54.22 इतकी होती. तर 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत संजय सावकारे यांनी 46,955 मताधिक्याने विजय संपादन केला. त्यांना एकूण 1 लाख 6 हजार 96 मते मिळाली. आता पर्यंत संजय सावकारे यांनी चार वेळेस आमदारकी भूषवली आहे. तर आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी भुसावळात एकच जल्लोष केलाय.
आतापर्यंत भूषवलेली पदे :
1) राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री - जळगाव
2) विधानसभा सदस्य भुसावळ विधान सभा सन 2009 ते 2014, 2014 ते 2019,
3) अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार समिती
4) सदस्य - लोकलेखा समिती, महाराष्ट्र विधानमंडळ मुंबई
5) सदस्य धर्मदाय रुग्णालय तपासणी समिती, महाराष्ट्र विधानमंडळ मुंबई
6) सदस्य - रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी भुसावळ
सध्या भूषवित असलेली पदे :
1) विधानसभा सदस्य भुसावळ विधानसभा सन 2024
2) संचालक - जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक लि. जळगाव
3) संचालक जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. जि. जळगाव
4) सदस्य - रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी भुसावळ
आणखी वाचा