एक्स्प्लोर

Narhari Zirwal Profile : बिगारी कामगार, आमदार ते विधानसभा उपाध्यक्ष, आता मंत्रिमंडळात नरहरी झिरवाळांना मोठी जबाबदारी

Narhari Zirwal Profile : गावचा सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा उपाध्यक्ष अशी झेप घेणारे नरहरी झिरवाळ यांनी आता मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे.

Narhari Zirwal Profile : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा (Maharashtra Cabinet Expansion) आज पडला. यात 39 आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रि‍पदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रि‍पदे आली. तर राष्ट्रवादीला 10 मंत्रि‍पदे मिळाली आहेत. यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून दिंडोरी विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द... 

नरहरी झिरवाळ यांचा जन्म 1 जून 1959 झाला.  दिंडोरी तालुक्यातील वनारे हे नरहरी झिरवाळ यांचे गाव. त्यांनी 12 वी नंतर कला शाखेत शिक्षण घेतले आहे. कुटुंबातील परिस्थिती हलाखीची असताना उदरनिर्वाह करण्यासाठी बांधकामामध्ये बिगारीचे काम त्यांनी केले होते. दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र त्या कामात त्यांचे मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर गावात शेती व इतर कामे करताना सामाजिक उपक्रमात त्यांनी सक्रिय घेतला. जनता दलाचे माजी खासदार कै. हरिभाऊ महाले यांच्यासोबत राहून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. त्यानंतर गावच्या राजकारणात प्रवेश करून ते वनारे गावाचे सरपंच झाले. सरपंचपदानंतर जनता दलातून पंचायत समितीचे सदस्य व राष्ट्रीय काँग्रेसमधून ते उपसभापती झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2001 साली जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याची संधी त्यांना मिळाली. 

दिंडोरी विधानसभेतून चार वेळा आमदार

2004 सालच्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. मात्र, लोकसभा निवडणुकीत देखील त्यांचा पराभव झाला. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून 2004, 2014 व 2019, 2024 या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये झिरवाळ चार वेळा आमदार झाले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष या नात्यानं राज्यातील सत्ता संघर्षाच्या काळात नरहरी झिरवाळ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. शरद पवार यांच्या आशीर्वादाने दिंडोरीचे आमदार झालेले नरहरी झिरवाळ अजित पवारांशी एकनिष्ठ आहेत.  जेव्हा जेव्हा अजित पवारांनी वेगळा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा झिरवाळ त्यांच्या सोबत होते.

सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध

गावचा सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा उपाध्यक्ष अशी झेप घेणारे नरहरी झिरवाळ यांनी आता मंत्रि‍पदाची शपथ घेतली आहे. ग्रामीण पेहराव, आदिवासी नृत्य, संस्कृतीचे दर्शन, मुद्दे मांडण्याची खास शैली,   खुमासदार भाषण, सर्वपक्षीय नेत्यांशी असणारे संबंध यामुळे झिरवाळ यांची छाप जिथे जातात तिथे दिसून येते. आजही ते शेती करतात आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जलसंधारण, कुपोषणमुक्ती, जंगलतोड बंदी, आदिवासी बांधवांचे प्रश्न आणि महाराष्ट्र गुजरात पाणी प्रश्नावर त्यांचा गाढा अभ्यास आहे.

आणखी वाचा 

Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Grok AI | एलॉन मस्क यांचे Grok AI चॅटबॉट नेमकं आहे तरी काय? Why Is Grok?ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 20 March 2025Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 20 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed: खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
खोक्याची रवानगी पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत, शिरूरच्या दिवाणी न्यायालयाचा निर्णय
Nagpur violence : नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
नागपूर हिंसाचार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, फहीम खानसह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ? नाशिक विभागीय आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस, नेमकं कारण काय?
Allahabad High Court : स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
स्तन पकडणे किंवा पायजाम्याची नाडी तोडणे बलात्कार नाही : अलाहाबाद हायकोर्ट
Aaditya Thackeray & Disha Salian Case: आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करुन चौकशी करा, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांची सभागृहात मोठी मागणी
Disha Salian case Aaditya Thackeray: एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
एकनाथ शिंदेंचा आमदार आदित्य ठाकरेंच्या बाजूने, म्हणाले, गेली तीन वर्षे आमचंच सरकार, तपासात काहीच आढळलं नाही!
Nashik Crime : रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
रंगपंचमीच्या दिवशी दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं! सख्ख्या भावांना धारदार शस्त्रानं वार करून संपवलं; एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी
Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय
Embed widget