Ravindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यता
Ravindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यता
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. नागपुरात आज अनेक नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दुपारी 4 वाजता हा शपथविधी समारोह पार पडेल. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिपद मिळण्यासाठी नेते मंडळी जोर लावत होते. काहीही झालं तरी मलाच मंत्रिपद मिळणार, असा दावा अनेक नेते करत होते. दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अनेक मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना मंत्रिपद देण्याचं ठरवलंय. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या सरकारमध्ये एक किंवा दोन नव्हे तर तब्बल 19 नवे चेहरे असण्याची शक्यता आहे. कोणत्या पक्षाच्या किती नव्या नेत्यांना संधी? देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या नेत्यांना संधी मिळण्याच शक्यता आहे. महायुतीच्या सरकारमध्ये एकूण तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांनी आपल्या सर्व नेत्यांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना यावेळी संधी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा पक्षातर्फे एकूण 9 नवे चेहरे असतील. राष्ट्रवादी पक्षात एकूण चार चेहरे नवे असतील. तर शिवसेना पक्षात एकूण 6 नव्या नेत्याना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.