एक्स्प्लोर

विधानपरिषद ते विधानसभेत हॅट्टट्रीक; BCCI चे खजिनदार अन् आता दुसऱ्यांदा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान; कोण आहेत आशिष शेलार?

Maharashtra Cabinet Expension: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (BJP Mumbai President Ashish Shelar) यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. 

Who Is New Minister Ashish Shelar? महायुतीच्या (Mahayuti) नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expension) आज नागपुरात (Nagpur) पार पडला. सर्व मंत्र्यांना फोन करून यासंदर्भात आधीच सांगण्यात आलेलं. भाजपकडून (BJP) 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यासोबतच शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनाही फोन करून आधीच माहिती देण्यात आलेली. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (BJP Mumbai President Ashish Shelar) यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. 

देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांची वर्णी लागली आहे. भाजपला मुंबईत रुजवण्याचं आणि पक्ष वाढवण्याचं काम आशिष शेलारांनी अगदी चोख केल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. अशातच आता मंत्रिपदाची माळ आशिष शेलारांच्या गळ्यात पडणार आहे. जाणून घेऊयात, आशिष शेलारांच्या कारकीर्दबाबत सविस्तर...  

आशिष शेलारांची मंत्रीपदी वर्णी

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज दुपारी 4 वाजता शपथविधी होणार आहे. यासाठी नागपुरात पूर्ण तयारी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप अशा एकूण 35 आमदारांनी शपथ घेतली आहे. भाजपचे 20, शिवसेनेचे 13 आणि राष्ट्रवादीचे 10 आमदार शपथ घेतली आहे. अशातच यंदा आशिष शेलारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार 2014 मध्ये सर्वात आधी विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाकडून मोठा जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांच्या नावाची भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. फक्त राजकारणातच नव्हे तर आशिष शेलारांचा क्रिकेटमध्येही दबदबा पाहायला मिळाला.  17 जून 2015 रोजी त्यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर सध्या ते बीसीसीआयचे खजिनदार म्हणून काम पाहत आहेत. 

मुंबईतील अगदी सर्वसामान्य कुटुंबात 3 ऑक्टोबर 1972 रोजी आशिष शेलार यांचा जन्म झाला. मुंबईतील गिरणी कामगारांच्या चाळीत जन्मलेल्या आशिष शेलार यांचा सुरुवातीपासूनच जनसेवेकडे कल होता. त्यांनी पार्ले कॉलेजमधून 1992 मध्ये बॅचलर ऑफ सायन्स (BSC) पदवी मिळवली, त्यानंतर जी.जे. अडवाणी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली. महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) सोबत त्यांची सार्वजनिक सेवेची कारकीर्द सुरू होतीच. 

विधानपरिषदेवर निवड ते विधानसभेत हॅट्टट्रीक

आशिष शेलार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता पार्टी (भाजप) मधून केली, त्यांच्या समर्पण आणि नेतृत्व कौशल्यामुळे त्यांना पक्षश्रेष्ठींनी हेरलं आणि वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर सोपवल्या. स्थानिक नागरी समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे खार पश्चिम येथील नगरसेवक म्हणून त्यांना ओळख मिळाली.

2012 मध्ये, आशिष शेलार यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर नियुक्ती झाली, 2014 पर्यंत त्यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून काम केलं. त्यानंतर, पक्षश्रेष्ठींनी आशिष शेलारांवर विश्वास टाकत त्यांना 2014 मध्ये विधान परिषदेच्या रिंगणात उतरवलं. त्यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि 26,000 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आपल्या विजयाची पुनरावृत्ती करून वांद्र्यात आपला दबदबा वाढवला. त्यानंतर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही आशिष शेलार यांनी विजय मिळवत हॅट्टट्रीक मारली. 

सलग दोनदा भाजप मुंबई अध्यक्ष म्हणून वर्णी 

आशिष शेलार यांची सलग दोन वेळा पक्षश्रेष्ठींकडून मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या भूमिकेत त्यांनी पक्षाचा अजेंडा मुंबईच्या विकासाच्या गरजांशी जुळवून घेतला आणि मुंबई पक्ष रुजवण्याचं काम केलं. यावेळी आशिष शेलारांपुढे सर्वात मोठं आव्हान होतं, शिवसेनेचं... पण, तेदेखील वेळोवेळी शेलारांनी पेलल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईच्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचं त्यांचं सखोल ज्ञान आणि प्रभावी नेतृत्व यामुळे पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये शेलारांच्या नावाचा आवर्जुन समावेश केला जातो.

2019 मध्ये लागलेली फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वर्णी 

2019 मध्ये, आशिष शेलार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं. तरुणांमध्ये तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर रोखण्यासाठी वाचनाला प्रोत्साहन देणे आणि लायब्ररी विकसित करणं हा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला. 

क्रिकेटमध्ये मैदानात सुद्धा आशिष शेलार यांचा डंका....

आशिष शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. तसं पाहिलं तर 52 वर्षांच्या आशिष शेलार यांचा राजकारणाशी तर चांगला संबंध आहेच पण क्रिकेटच्या मैदानात सुद्धा यांचा दबदबा आहे. मागील काही दिवसांत आशिष शेलार यांचं नाव क्रिकेट जगतात सातत्यानं पुढं येताना दिसत आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. आणि त्यांचे आशिष हे सध्याचे खजिनदार आहेत. त्यानंतर बीसीसीआयनं शेलारांवर आणखी एक जबाबदारी सोपवली. त्यांना जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांची बीसीसीआयच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली होती. आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) मध्येही मोठी भूमिका बजावली आहे. जून 2015 मध्ये आशिषची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर 12 जानेवारी 2017 रोजी आशिषची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
Chandrakant Patil : गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईलRavindra Chavan : रविंंद्र चव्हाणांचं मंत्रिमंडळात नाव नसण्याची शक्यताCabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate Profile : जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
जिल्हा परिषद सभापती, पाच वेळा आमदार अन् आता माणिकराव कोकाटेंकडे मंत्रि‍पदाची धुरा, अजितदादांनी सिन्नरकरांना दिलेला शब्द पाळला
Chandrakant Patil : गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
गिरणी कामगाराचा मुलगा, भाजप प्रदेशाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांतदादा पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
मंत्रिमंडळात रवी राणांना संधी नाहीच, नवनीत राणांचं स्टेटस व्हायरल; व्हिडिओतून नाराजी उघड
Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रि‍पदी विराजमान
Hasan Mushrif Profile : पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
पंचायत समिती सभापती ते कॅबिनेट मंत्री; हसन मुश्रीफांचा मंत्रिपदाचा अन् आमदारकीचा षटकार!
Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय, सेनेतील पदं सोडली
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी शिवसेनेत मोठी घडामोड, आमदार नरेंद्र भोंडेकरांचा मंत्रिपद न मिळाल्यानं मोठा निर्णय
Arvind Kejriwal : महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होत असताना अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, मुख्यमंत्र्यांबाबत मोठा निर्णय
नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच सर्व उमेदवार जाहीर, मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ ठरला
Devendra Fadnavis Cabinet Minister List : तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
तब्बल 33 वर्षांनंतर राज्याच्या उपराजधानीत मंत्रिमंडळ विस्तार अन् शपथविधी; 19 आमदारांना पहिल्यांदाच मंत्रीपदाचा कोट!
Embed widget