एक्स्प्लोर

Nashik News : जन्मदात्री गेली! रुढी परंपरा झुगारून मुलानं घेतला महत्वाचा निर्णय, मरणोत्तर केलं देहदान 

Nashik News : नाशिकमधील चांदगुडे कुटुंबीयांनी देखील कर्मकांडाला फाटा देत निधन झालेल्या आईचे मरणोत्तर देहदान केले आहे. 

Nashik News : आपल्या जवळच्या नात्यातील व्यक्तींचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी किंवा अंत्यंसंस्कार करताना कुटुंबीय अतिशय संवेदनशील असतात. मात्र आता अनेकजण रुढी परंपरांना फाटा देत नवा आदर्श घालून देण्याचा प्रयत्न करत असतात. नाशिकमधील (Nashik) चांदगुडे कुटुंबियांनी देखील कर्मकांडाला फाटा देत निधन झालेल्या आईचे मरणोत्तर देहदान (organ donation) केले आहे. 

नाशिक (Nashik) येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्या आई सुगंधाबाई त्र्यंबक चांदगुडे यांचे आजारपणामुळे गुरुवारी निधन झाले. त्यांचे वय 83 वर्ष होते. त्यांनी मरणोत्तर देहदान केले. त्यांचा देह डाॅ वसंतराव पवार मेडिकल काॅलेजला देण्यात आला. त्यांचे कोणतेही कर्मकांड करणार नसल्याची माहिती चांदगुडे कुटुंबाने दिली. विधवा प्रथा निर्मूलनाचे शासनाने परिपत्रक काढल्यानंतर महाराष्ट्रात प्रथमच सुगंधाबाई यांनी त्याची अंमलबजावणी केली होती. विधवा असूनही त्यांनी टिकली ,मंगळसूत्र, जोडवे परिधान केले होते. चांदगुडे कुटुंबियांनी याआधीही अनेक पुरोगामी निर्णय घेऊन समाजाला आदर्श घालून दिला आहे.

दरम्यान कृष्णा चांदगुडे (Krushna Chandgude) हे नेहमीच आपल्या विविध कृतीतून समाजाला नवा संदेश देण्याचे काम करतात. यावेळी त्यांनी जुन्या रुढी परंपरा आणि कर्मकांडांना फाटा देत आईच्या मृतदेहावर कुठल्याही प्रकारे अंत्यविधी न करता देहदान करण्याचा निर्णय घेतला. नाशिक येथील मेडिकल कॉलेजला आईचा देह सुपूर्द केला. आई सुगंधाबाई यांची आदरांजली सभा 12 फेब्रुवारी रोजी त्यांच्या कोपरगाव तालुक्यातील चासनळी या गावी ठेवण्यात आली आहे. यावेळी 'देहदान व अवयवदान, काळाची गरज'  या विषयावर अवयवदान चळवळीचे कार्यकर्त सुनील देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. या प्रसंगी मरणोत्तर देहदानाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींचे फाॅर्म भरून घेणार असल्याचे कृष्णा चांदगुडे यांनी सांगितले.

अवयवदान हेच सर्वश्रेष्ठ दान

हल्ली अनेकजण आपल्या कृतीतून अनेकांना मदत करत असतात. तुम्ही केलेली मदत एखाद्याला नवी उभारी देण्याचे करत असते. तसेच मृत्यनंतर केलेले देहदान देखील एखाद्या व्यक्तीसाठी नवे जीवन देणारे असते. किंवा तुम्ही दिलेला अवयव एका व्यक्तीचे नाही तर अनेक व्यक्तींच्या जीवनात आनंद पेरण्याचे काम करू शकतो. त्यामुळेच हल्ली अनेकजण अंत्यविधी न करता आपल्या कुटुंबियांचे नातेवाईकांचे अवयवदान करत असतात. अवयवदान हे जिवंत असताना आणि मृत्यूनंतर अशा दोन्ही वेळी करता येते. एक व्यक्ती मृत्यूनंतर अवयवदान केल्यास 8 जणांना नवे जीवन मिळते. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एक करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पुढाकार, पक्षाच्या कोर कमिटीची बैठक होणार
NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
Nagpur Crime : संघ मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर गोळीबाराचा थरार, तर MIDCमध्ये एकच ठिकाणी चार दिवसात दोघांना संपवलं, उपराजधानीत नेमकं चाललंय तरी काय?
नागपूरच्या संघ मुख्यालयापासून अवघ्या दीड किलोमीटर गोळीबाराचा थरार, तर MIDCमध्ये एकच ठिकाणी चार दिवसात दोघांना संपवलं, उपराजधानीत नेमकं चाललंय तरी काय?
Gopichand Padalkar on Jayant Patil: पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन जयंत पाटलांनी मोदींना टोला हाणला, गोपीचंद पडळकरांचा पलटवार, म्हणाले...
पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन जयंत पाटलांनी मोदींना टोला हाणला, गोपीचंद पडळकरांचा पलटवार, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
व्ही. डी. सतीशन केरळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; काँग्रेसच्या 12 मंत्र्यांसह 6 पक्षांतील 21 मंत्र्यांचा समावेश, राहुल आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार
Share Market: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा युद्धाची धमकी, शेअर बाजारात मोठी घसरण, रुपया 96.17 च्या निचांकी पातळीवर
NEET Exam Paper Leak: अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
अभ्यासात ढ असलेल्या श्रीमंत घरच्या विद्यार्थ्यांना हेरायचा, डॉक्टर करण्याचं स्वप्न दाखवून लाखो रुपये उकळायचा, शुभम खैरनारची मोडस ऑपरेंडी?
NCP Crisis Sunetra Pawar and Parth Pawar: राष्ट्रवादीच्या गोटात पार्थ सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची कुजबुज, तटकरे-प्रफुल पटेलांबाबतचा पत्रप्रपंच पार्थ पवारांनीच केला?
पार्थ सुनेत्रा पवारांचं ऐकत नसल्याची कुजबुज, तटकरे-प्रफुल पटेलांबाबतचा पत्रप्रपंच पार्थ पवारांनीच केला?
Eknath Shinde : 'काळजी करू नका आरोपींचा नक्कीच बंदोबस्त करू'; गेवराईत मारहाण झालेल्या महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, व्हिडिओ कॉल वरून साधला संवाद
'काळजी करू नका आरोपींचा नक्कीच बंदोबस्त करू'; गेवराईत मारहाण झालेल्या महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द, व्हिडिओ कॉल वरून साधला संवाद
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
Maharashtra News LIVE Updates: वाशिममध्ये चौथ्या दिवशीही डिझेलचा ठणठणाट; वाहनधारकांची मोठी दमछाक, वाहनाची चाके थांबण्याचे चित्र
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
Pune Crime News : पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
पतीचा क्ररतेचा कळस, पत्नीच्या प्रायव्हेट पार्टवर ॲसिड ओतलं, 15 दिवस घरात कोंडलं अन्..., पुण्यातील हादरवणारी घटना
Embed widget