(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : दुगारवाडी धबधबा ठरणार मराठवाड्याचा तारणहार, त्र्यंबकच्या कळमुस्ते वळण योजनेला शासनाची मंजुरी
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळमुस्ते आणि चिमणपाडा या दोन वळण योजनांना अखेर सात वर्षानंतर मुहूर्त लाभला आहे.
Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळमुस्ते आणि चिमणपाडा या दोन वळण योजनांना अखेर सात वर्षानंतर मुहूर्त लाभला आहे. मंत्रिमंडळाने या दोन्ही योजनांना मंजुरी दिल्याने आता पश्चिम वाहिनी नद्यांचे दमनगंगा पार खोऱ्यात वाहून जाणारे पाणी 735.16 इतके पाणी गोदावरी खोऱ्यात वळून नाशिकसह मराठवाड्यात लाभ मिळणार आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे दोघेही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जवळपास आठ निर्णय घेण्यात आले. यात त्र्यंबकेश्वरसह दिंडोरी (Dindori) तालुक्यात महत्वपूर्ण वळण योजनांचा समावेश आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कळमुस्ते आणि चिमणपाडा या दोन वळण योजनांना अखेर सात वर्षानंतर मुहूर्त लाभला आहे. मंत्रिमंडळाने या दोन्ही योजनांना मंजुरी दिल्याने आता पश्चिम वाहिनी नद्यांचे दमनगंगा पार खोऱ्यात वाहून जाणारे पाणी 735.16 दलघफू इतके पाणी गोदावरी खोऱ्यात वळून नाशिकसह मराठवाड्यात लाभ मिळणार आहे.
कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात असून कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव म्हणजेच दुगारवाडी (Dugarwadi) गावाजवळील दमनगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर आहे. या योजनेद्वारे खोऱ्यात 19.54 दलघमी इतके पाणी 13.28 किमीच्या बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. तसेच 127 दलघफु पाणी स्थानिक वापरासाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 494.98 कोटींचा खर्च असून 39.6 हेक्टर वनजमीन आणि 9.5 हेक्टर खासगी जमीन असे एकूण 49.10 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असल्याची माहिती आहे. उपलब्ध पाण्यातून 1984 हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर स्थापना करण्याचे नियोजन असल्याचे समजते. समुद्रात वाहून जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी पाच वळण योजनांचे प्रस्ताव या वित्त व नियोजन विभागाकडे मान्यतेसाठी 2019 पासून पडून होते.
तर दिंडोरी (Dindori) तालुक्यातील चिमणपाडा ही योजना देखील मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आली आहे. चिमणपाडा योजनेत पश्चिम वाहिनी नद्यांद्वारे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून, प्रवाही वळण योजनेद्वारे गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येईल. यामुळे करंजवण धरणातील 111 हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित होईल. या योजनेद्वारे 45 दलघफू इतके पाणी मिळणार असून पार खोऱ्यातील पाणी हे गोदावरीत वळवण्यात येणार आहे. त्यासाठी 36.40 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूण 23 योजनांचे नियोजन होते, त्यापैकी 14 यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या, तर नऊ शिल्लक होत्या. त्यातील चार योजनांचे बांधकाम सुरू आहे तर उर्वरित पाच योजनांचे प्रस्ताव शासनाकडे सादर असून त्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते असते आणि दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा या दोन्ही योजनांना मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.