Nashik Rain Updates: नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत रात्रभर मुसळधार; शेतकऱ्यांना दिलासा, शेती कामांना लगबग
Nashik Rain Updates: गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात रिपरिप सुरू असून अशातच काल रात्रभर त्र्यंबकेश्वर सह इगतपुरी परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीकामांना वेग आला आहे.
Nashik Rain Updates: गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मान्सूनचे (Maharashtra Monsoon Updates) जोरदार आगमन नाशिकसह (Nashik District) जिल्ह्यातील काही भागांत झाले आहे. दिवसभर रिपरिपसह रात्री जोरदार पाऊस बरसत आहे. गुरुवारी मध्यरात्री पासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून सकाळपर्यंत पाऊस सुरूच आहे. रात्रभर पाऊस सुरू असल्यानं, नाशिक शहरातील अनेक नदी नाल्यांना दुथडी भरुन वाहू लागले आहे. तर अनेक भागांत रस्त्याची दुरावस्था झाल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Tehsil) अनेक भागांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. इगतपुरी (Igatpuri) परिसराला देखील पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतात पाणी साचल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे.
गेल्या महिनाभरापासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूननं (Maharashtra Rain Updates) जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक भागांत भात पेरणीला सुरुवात झाली आहे. मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील बहुतांश भागांत पेरण्या खोळंबल्या होत्या, त्या पूर्ण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे.
पेरणीची लगबग, शेतकऱ्यांना दिलासा
गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे खोळंबलेली भात पेरणी सुरू झाली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. जून महिन्यात पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पेरणी सुरू होत असते. मात्र यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतीत होता.अखेर पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भात पेरणीला वेग आला आहे. त्याचबरोबर इतरही पिकांची लागवड केली जात आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत शेतात पाणी साचले असून नाले देखील वाहू लागले आहेत.
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा
राज्याच्या काही भागात पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :