एक्स्प्लोर

Mumbai University Senate Election : आदित्य ठाकरे यांना पुन्हा धक्का, दहा सिनेट सदस्यांपैकी चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Mumbai University Senate Election : आदित्य ठाकरे यांना पुन्हा  धक्का, दहा सिनेट सदस्यांपैकी चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन

  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे.

 राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक

राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 

विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस'

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 

खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक

लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.

21:27 PM (IST)  •  18 Aug 2023

Senate Election : आदित्य ठाकरे यांना पुन्हा  धक्का, दहा सिनेट सदस्यांपैकी चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल

आदित्य ठाकरे यांना पुन्हा  धक्का, दहा सिनेट सदस्यांपैकी चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल. 

प्रवीण पाटकर या सिनेट सदस्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश.

आजच मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रद्द केल्यामुळे आदित्य ठाकरेंची युवा सेना आक्रमक झाली होती.

सरकार निवडणुकांना घाबरत असल्याचा आदित्य ठाकरे यांनी केला होता दावा.

मात्र बोगस मतदार नोंदणी होत असल्यामुळे निवडणुका स्थगित केल्याचा आशिष शेलार आणि राहुल कनल यांचा दावा.

18:34 PM (IST)  •  18 Aug 2023

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2023| शुक्रवार

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More
17:29 PM (IST)  •  18 Aug 2023

Maharashtra Cabinet : 17 जिल्ह्यातील आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडणार; राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय एका क्लिकवर...

Maharashtra Cabinet Meeting : आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये आदिवासी पाड्यांना पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी 17 जिल्ह्यातील पाडे मुख्य रस्त्यांना जोडण्यात येणार आहे. Read More
14:01 PM (IST)  •  18 Aug 2023

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री सिनेट निवडणुकाला देखील घाबरले, आदित्य ठाकरेंची टीका

 सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde)  सडकून टीका केली. Read More
11:21 AM (IST)  •  18 Aug 2023

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, राज्यभरातील पीक पाण्याचा आढावा घेणार

Cabinet Meeting: आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचीही आढावा घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणाराय. राज्यातील अनेक भागांकडे पावसाने पाठ फिरवलीय. शिवाय अनेक धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठी नाही. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोपSSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget