एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : मुख्यमंत्री सिनेट निवडणुकाला देखील घाबरले, आदित्य ठाकरेंची टीका

 सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde)  सडकून टीका केली.

मुंबई : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला (Mumbai University Senate Election) स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत तर  विरोधक देखील  आक्रमक झाले आहेत.  सिनेट निवडणूक स्थगित झाल्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde)  सडकून टीका केली. स्थानिक आणि लोकसभा निवडणुकीप्रमाणं मुख्यमंत्री सिनेट निवडणुकीला देखील घाबरले, असा टोला आदित्य ठाकरे  यांनी लगावला आहे. 

 मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला स्थगित दिल्याने राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटना नाराज झाल्या आहेत. 9 ऑगस्ट रोजी सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता. 10  सप्टेंबरला निवडणूक आणि 13 सप्टेंबरला निकाल, असा हा कार्यक्रम होता. पण व्यवस्थापन परिषदेच्या कालच्या बैठकीत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित झालाय, एवढं नक्की. यावरून आता विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे.

निवडणूक स्थगित का झाली? आदित्य ठाकरेंचा सवाल

गुरुवारी रात्री 11 वाजता सिनेट निवडणुकांचे पत्र समोर आले. सिनेट निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.  आमचा 100 टक्के निकाल लागणार होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आणि नंतर स्थगित झाला. मणिपूरसारखे वातावरण येथे नाही, भांडण नाही,वाद नाही. सव्वा लाख मतदारांनी यामध्ये नाव नोंदविले आहे.  मग अस काय घडलं? ही निवडणूक स्थगित का झाली? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत कोणीही कारण सांगत नाही, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही आम्ही तुमचे सरकार पाडणार

दोन पक्ष फोडले, दोन परिवार फोडले. महाशक्ती सोबत असून निवडणुकीला घाबरतात का? लोकसभेला देखील असेच करण्याची शक्यता आहे. लोकसभेला देखील निवडणुका जाहीर करतील आणि मग स्थगित करतील. सिनेट तुमचे सरकार पाडणार नाही तुमचे सरकार तर आम्हीच पाडणार आहोत. त्यांची तयारी पूर्ण आहे की नाही माहीत नाही  पण तयारी नसेल म्हणून असे झाले असेल, असा टोला आदित्या ठाकरेंनी लगावला आहे. 

हे ही वाचा :                                                         

Mumbai University Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची पदवीधर सिनेट निवडणूक अचानक स्थगित; विद्यार्थी संघटना संतप्त

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Orchestra Bar Bill : ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली चालणाऱ्या अश्लील डान्सबारवर पडणार मोठा हातोडा! कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मातोश्रीवर आमदारांची  बैठक सुरु, बैठकीला कोणकोणते आमदार उपस्थित?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश

Embed widget