Maharashtra LIVE Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Nanded News : नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून 750 कोटी रुपयांची तरतूद; नांदेडकरांकडून आनंद साजरा
Nanded News : नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने 750 कोटी रुपयांची तरतूद केलीय, सरकारच्या या निर्णयाचे नांदेडच्या नायगांव शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. फटाक्यांची आतिषबाजी करत नायगांव आणि नरसी येथील नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केलय. तसेच या नुतन रेल्वेमार्गासाठी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्याबाबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहेत.
Bhiwandi : राष्ट्रवादीच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती
Bhiwandi : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या भिवंडी लोकसभा प्रभारी पदी सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पक्षाचे अधिवेशन शिर्डी येथे सुरू असून या ठिकाणी शरद पवार यांनी बाळ्या मामा यांची भिवंडी लोकसभा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.

Nagpur News : नागपुरात भीषण अपघात, आई आणि मुलाचा मृत्यू
Nagpur News : नागपूर वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवा मैल चौकात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आलीये. या अपघातामध्ये आई आणि मुलाची मृत्यू झाला. तसेच मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Live Updates : 2005 पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रूजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
Maharashtra Live Updates : 2005 पूर्वी शासकीय जाहिरातीच्या माध्यमातून रूजू झालेल्या कर्मचा-यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे. साडेचार ते पाच हजार कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.