Maharashtra News LIVE Updates:शिवसेना शिंदे गटाची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, भरत गोगावले यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आव्हान
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एकाच दिवशी देशाचे दोन मोठे नेते सोलापुरात, 19 जानेवारीला शरद पवारही दौऱ्यावर
नाशिक आणि मुंबई दौऱ्यानंतर पुढच्याच आठवड्यात पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येतायत. सोलापूर शहरात 19 जानेवारी रोजी त्यांचा रोड शो आणि रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला आणि मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापलं असल्याचं पाहायला मिळतं आहे.
Rahul Narvekar : मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाहीये, ठाकरे गटाच्या याचिकेनंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
Rahul Narvekar : मी कुणाला संतुष्ट करायला निकाल दिला नाही, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसारच निकाल दिला. भारतातील कोणत्याही नागरिकाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीये. विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आलीये. त्यावर आता राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया समोर आलीये.























