Maharashtra News Updates 20 December 2022 : लक्झरी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार, सिन्नर - शिर्डी महामार्गावरील घटना; महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. याबरोबरच राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे.
Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणूक निकाल
राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीची आज मतमोजणी आहे. 18 डिसेंबरला राज्यातील 7135 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे.
Winter Assembly Session : विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस
महाविकास आघाडीची सकाळी 9 वाजता अजित पवारांच्या निवास्थानी बैठक होणार आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज सत्ताधारी पक्षाचे आमदार आंदोलन करणार आहेत.
वारकरी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
राज्यातील दहा वारकरी संघटना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या साधु-संतांवरील कथित वादग्रस्त वक्तव्यासोबतच महापुरूषांवरील अक्षेपार्ह वक्तव्याबाबत ही भेट असणार आहे.
नागपुरातील रामटेक येथे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
नागपूर जिल्ह्यातील रामटेक या ठिकाणी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या आवारात आज माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.
मनसेची बैठक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते, सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे.
भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी प्रदर्शित केली जाणार
भारतात 13 जानेवारी पासून सुरु होत असलेल्या हॉकी विश्वचषकाची ट्रॉफी आज भारतीय नौदलाच्या आयएनएस मोर्म्युगाव युद्धनौकेवर प्रदर्शित केली जाणार आहे. 13 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान ओडिसातील कलिंगा, भुवनेश्वर आणि राहुरकेला येथे हॉकी विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.
ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याच्या याचिकेवर सुनावणी
भाजप नेते चंद्रकांत पाटील, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राम कदम यांच्यासह मुंबई पोलिस आयुक्तांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळेंकडून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टासमोर सुनावणी होणार आहे.
लक्झरी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार, सिन्नर - शिर्डी महामार्गावरील घटना
भरधाव खासगी लक्झरी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार झाल्याची दुर्दैवी घटना सिन्नर - शिर्डी महामार्गावर आज सकाळच्या सुमारास घडलीय. संजय शंभू जाधव आणि महेश शंकर सिंग अशी मयत तरुणांची नावे आहेत. संजय आणि महेश हे मुंबईच्या साई संस्कृती फाऊंडेशन व राज प्रतिष्ठानच्या वतीने शिर्डीसाठी काढण्यात आलेल्या पायी पालखी यात्रेत सहभागी झाले होते. पालखी मुसळगाव शिवारात आली असता पाठीमागून आलेल्या लक्झरी बसने धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले होते. मित्रांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधीच दोघांचा मृत्यू झाला. सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून फरार बसचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.
पुण्यात सिंहगड रस्त्यावर टेम्पोला आग
सिंहगड रस्त्यावर बिग बाजार समोर मालवाहतुक करणाऱ्या टेम्पोला आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवण्याचं काम आहे. आगीचे कारण समजले नसून जखमी कोणी नाही.
Anil Deshmukh: अनिल देशमुखांचे स्वीय सचिव संजिव पलांडे यांना जामीन मंजूर
संजीव पालांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा,
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव,
मनी लॉन्ड्रीग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर,
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्याकडून जामीन मंजूर,
संजीव पालांडे यांना दोन लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर.
Live Update : फेविक्विक प्रकरणामुळे लिंबागणेशची मतमोजणी लांबणीवर
Live Update : मतदान यंत्रात फेविक्वीक टाकण्याच्या प्रकारामुळे चर्चेत आलेल्या लिंबागणेश ग्रामपंचायतची मतमोजणी लांबणीवर टाकण्यात आली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे आता या गावाची मतमोजणी शेवटच्या फेरीत होऊ शकते. नियोजित कार्यक्रमानुसार ही मतमोजणी 11 व्या फेरीत होणार होती. लिंबागणेशमधल्या मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. निवडणूक आयोगाचा निर्देश आल्यानंतरच या संदर्भात फेर मतदान घ्यायचं किंवा नाही याच्यावर निर्णय होऊ शकतो
Anil Deshmukh Bail Update : अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी
Anil Deshmukh Bail : अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी
22 डिसेंबरपर्यंत दिलेली स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआय हायकोर्टात
सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यानं 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती