एक्स्प्लोर

Maharashtra News Live Updates : औरंगाबादच्या कपडा मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल; देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Live Updates : औरंगाबादच्या कपडा मार्केटमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल; देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.

आज राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह असरणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी होणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रामकुंडावर स्नान करण्याला विशेष महत्व असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे. याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबादला विशाखापट्टनवरून जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.   

राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह
आज राज्यभर मकर संक्रांतीच्या सणाचा उत्साह असरणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी सामुहिक पतंगबाजी होणार आहेत. मकर संक्रांतीच्या निमित्ताने रामकुंडावर स्नान करण्याला विशेष महत्व असल्याने भाविकांची गर्दी राहणार आहे.  

मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धा

कोरोना नंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत टाटा मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आज पहाटे 5.15 वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरूवात होणार आहे. मॅरेथॉनला पोहचण्यासाठी विशेष लोकल बोरीवलीहून पहाटे 3.45 वाजता सुटणार आहे. मॅरेथॉनला सिलीब्रिटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत.  

बीडच्या गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
संत वामन भाऊ यांच्या 47 व्या पुण्यतिथी निमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर कार्यक्रम होणार आहे.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पंकजा मुंडेही उपस्थिती लावणार आहेत. 

रत्नागिरीत कल्याण विधी सोहळा 

आज प्रसिद्ध अशा मार्लेश्वर या ठिकाणी कल्याण विधी सोहळा अर्थात देवाचं लग्न सकाळी 10 नंतर संपन्न होणार आहे. राज्यातील ही अनोखी प्रथा शेकडो वर्षांपासून चालत आलेली असून आजही तितक्याच भक्तिभावाने जपली गेली आणि साजरी केली जातेय. 

अमरावतीत आजपासून शंकरपटाला सुरूवात
विदर्भात सर्वात प्रसिध्द असलेला शंकरपट रविवारपासून सुरू होतोय. तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे चार दिवसीय शंकरपटाच आयोजन करण्यात आलंय. रविवारी दो-दाणी, सोमवार - मंगळवारी एकदानी आणि बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिकंदराबादला विशाखापट्टनवरून जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.  

सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा 

 सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरु आहे. सिद्धरामेश्वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह शनिवारी पार पडला. त्यानंतर आज संध्याकाळी यात्रेतील होम प्रदीपन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर भाकणूक कार्यक्रम पार पडेल. बाजरीच्या पाच पेंड्यांना साडी, चोळी, खण आणि मंगल चिन्हाचा वापर करुन कुंभार कन्येचे रुप देण्यात येते. त्यानंतर मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते पुजा करुन हा होमप्रदीपन विधी पार पडतो. तर होम विधी सोहळ्यानंतर भाकणुकीचा कार्यक्रम होईल. आगामी वर्ष कसा असेल या संदर्भात सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत भाकनुक केली जाते. संध्याकाळी 5 नंतर या सोहळ्याला सुरुवात होईल. 

भारत श्रीलंका दरम्यान अंतिम सामना

भारत आणि श्रीलंका दरम्यान अंतिम सामना दुपारी 1.30 वाजता तिरूअनंतपुरम येथे होणार आहे. 

21:12 PM (IST)  •  15 Jan 2023

इंस्टाग्रामवर  मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, एकाला अटक

इंस्टाग्रामवर एका  15 वर्षीय मुलीशी मैत्री करत तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला कोलशेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अक्षय गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे. अक्षयने पीडित तरुणी बरोबर इंस्टाग्रामवर ओळख वाढवत मैत्री केली. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यात पीडिता गर्भवती राहिली. गेल्या एक वर्षापासून तो पीडितेवर अतिप्रसंग करीत होता. अखेर पीडितीने या प्रकरणी कोलशेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अक्षय विरोधात गुन्हा दखल करत त्याला बेड्या ठोकल्या. 

18:10 PM (IST)  •  15 Jan 2023

डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाची कारवाई

डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाची कारवाई

14:57 PM (IST)  •  15 Jan 2023

Mumbai News : मुंबई मॅरेथॉनमध्ये 55 हजारांहून अधिक धावपटू सहभागी

Mumbai News : मुंबई मॅरेथाॅनमध्ये 55 हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले होते. यात मुंबईसोबतच देशातील अनेक शहरांमधील लोकं सहभागी झाले होते. पुण्यातून देखील काही धावपटू पूर्ण मॅरेथाॅन पळताना बघायला मिळाले. 

14:08 PM (IST)  •  15 Jan 2023

Amravati : अमरावतीच्या तळेगाव दशासरचा शंकरपटला सुरुवात

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे कृषक सुधार मंडळाद्वारे आजपासून चार दिवसीय शंकरपट आयोजित करण्यात आला आहे. आज रविवारी दो-दाणी, सोमवार, आणि मंगळवारी एकदानी आणि बुधवारी महिलांचा शंकरपट होणार आहे. 
स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथील शंकरपटाला सुरुवात झाली. 20 एकर जागेत हा पट आणि यात्रा भरते. राज्यभरातून अनेक बैलजोड्या याठिकाणी दाखल झाल्या असून यात 50 हुन अधिक पट गाजवणाऱ्या अनेक बैलजोड्यांचे आगमन झाले आहे.
14:05 PM (IST)  •  15 Jan 2023

Beed Dharur : धारूर तालुक्यातल्या मोरफळी गावात दोन दिवसापासून गूढ आवाजाने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

बीडच्या धारूर तालुक्यातील मोरफळी गावांमध्ये गेल्या दोन दिवसापासून जमिनीमधून गूढ आवाज येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल आहे. डोंगर दऱ्यामध्ये वसलेल्या मोरफळी गावामध्ये मध्यरात्री आणि आज सकाळी अचानक जमिनीतून गुढ आवाज झाल्यानंतर जमीन हादरल्याने नागरिकांनी गुढ आवाज कशामुळे येतो याची तात्काळ तज्ञांनी तपासणी करावी अशी मागणी केली आहे. जमिनीतून अचानक हा आवाज आल्यानं गावातील घरांच्या भिंती हालतात तर अनेक घरातील भांडे हे जमिनीवर पडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget