एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 04 November 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 04 November 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापुजा संपन्न, औरंगाबादचं साळुंके दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी  

आज कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आहे. यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकिय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते.

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावेळी श्री. विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. त्याचबरोबर गेली 50 वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला.  माधवराव साळुंखे  हे समाज कल्याण विभागातून  सेवानिवृत्त झाले आहेत. गेली 50 वर्ष ते पंढरपूरची वारी करत आहेत.

फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा

फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Facebook India Head Ajit Mohan) यांनी आज अचानक राजीनामा दिला. वृत्तानुसार, अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. याआधी उमंग बेदी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. ज्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये पद सोडले. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटा प्लॅटफॉर्मने जाहीर केली आहे. मोहन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मेटा इंडियाचे संचालक आणि भागीदारी मनीष चोप्रा हे त्यांच्या जागी कंपनीचा अंतरिम कार्यभार स्वीकारणार आहेत. 

कोरोना लसीकरणावरुन भेदभाव? 

राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याविरोधात मुंबईतील मुलुंड येथील कनिष्ठ न्यायालयाने समन्स जारी केलं आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले नागरिक असा भेदभाव करणारे आदेश जाहीर केल्याबद्दल त्यांच्याविरोधात याचिका करण्यात आली होती. ज्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51(ब) सह 54, आणि 55 अंतर्गत त्यांना दोषी ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. या खटल्याच्या पुढील सुनावणीदरम्यान तिघांनाही प्रत्यक्ष किंवा वाकिलांमार्फत कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत राष्ट्रीय प्राधिकरणानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची जाणूनबुजून अवहेलना आणि उल्लंघन करून निव्वळ लस तयार करणाऱ्या कंपन्यांना फायदा करून देण्यात आला. याप्रकरणी तक्रारदार आणि इतर सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याच्या हेतुनं हे लसीकरण सक्तीचं केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते अंबर कोईरी यांनी ही तक्रार दाखल केली होती. याशिवाय या तिघांविरोधातही अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी करणारी याचिकाही दाखल केली होती. त्यात तिघांनाही प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. त्या याचिकेवर पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकेची दखल घेत त्यावर 11 जानेवारी रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

22:51 PM (IST)  •  04 Nov 2022

Jalgaon news : जळगावात मोठी कारवाई : तुरीच्या पिकात लागवड केलेली गांजाची शेती उध्वस्त, 61 लाखांची गांजांची झाडे जप्त 

Jalgaon news : एरंडोल तालुक्यातील खडकीसिम शेतशिवारात गांजाची शेती एरंडोल पोलिसांनी उधळून लावली आहे. पोलिसांनी तब्बल 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एरंडोल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील खडकीसिम येथील दिगंबर पंडित पाटील यांच्या शेतात आणि नितीन डिगंबर पाटील यांच्या तुर पिकाच्या शेतामध्ये गांजा या मादक पदार्थाची लागवड करून संगोपन होत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ अनिल पाटील, विलास पाटील, राजेंद्र पाटील, अकिल मुजावर, मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, पोलीस हवालदार पंकज पाटील, चालक हेमंत घोंगडे, होमगार्ड दिनेश पाटील यांच्यासह आदींनी शुक्रवार 4 नोव्हेंबर रोजी छापा टाकून दोन्ही शेतातून ६१ लाख २५ हजार रुपये किंमतीचा ८७५ किलो गांजा तसेच ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी हस्तगत केली. दरम्यान, दोन संशयित आरोपी हे शेतातून पसार झाले असल्याचे कळते. तर याबाबत पोलीस हवालदार विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

22:31 PM (IST)  •  04 Nov 2022

नाशिकमधील सिडकोचे कार्यालय त्वरीत बंद करुन सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इतरत्र रिक्त पदांनुसार पदस्थापना तातडीने करण्याचे शासनाचे आदेश

- नाशिकमधील सिडकोचे कार्यालय त्वरीत बंद करुन सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची इतरत्र रिक्त पदांनुसार पदस्थापना तातडीने करण्याचे शासनाचे आदेश

- शहराचे नियोजन करुन ते विकसीत करण्याच्या उद्देशाने 1970 साली करण्यात आली होती नाशिकमध्ये सिडकोची स्थापना 

- नाशिक सिडकोच्या कार्यक्षेत्रातील सेवा सुविधा पूर्ण केल्यांनतर त्यांचे हस्तांतरण नाशिक महानगरपालिका यांचेकडे करण्यात आले असल्याने सिडको कार्यालय बंद करण्याचा निर्णय

22:24 PM (IST)  •  04 Nov 2022

नागपुरातील शिवाजीनगर परिसरामध्ये रेस्टो लॉजमध्ये मारहाणीची घटना

नागपुरातील पॉश अशा रामनगरजवळील शिवाजीनगर परिसरामध्ये असलेल्या इल्युजन रेस्टो लॉजमध्ये रात्री गुंडागर्दी आणि मारहाणीची घटना घडली आहे. दोन नोव्हेंबरच्या रात्री इल्युजन रेस्टो लॉजमध्ये आठ तरुण  आत जाण्यास आग्रह करू लागले.मात्र तेथील बाउन्सरने त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. आतमध्ये खाजगी पार्टी सुरू असल्याने आत जाता येणार नसल्याचे बाउन्सरने त्या तरुणांना सांगितले. यावरून बाऊन्सर आणि त्या तरुणांमध्ये वादावादी सुरू झाली. या आठ तरुणांमध्ये काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. त्यांनी बाउन्सरला मारहाणीस सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी बाउन्सरच्या चेहऱ्यावर जबर मारहाण केली. याप्रकरणी अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  चार आरोपींना अटकही करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अविनाश शर्मा व सनी वाडे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर सिमेंट रोडवर घडलेल्या मारण्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिक मात्र धास्तावलेले आहे

21:41 PM (IST)  •  04 Nov 2022

Wardha News: पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहिर

 वर्धा जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापती पदाची आरक्षण सोडत आज काढण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी नितीन पाटील, महसूल सहाय्यक धीरज काबंळे यांच्यासह राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करीता लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने सभापतीपदे आरक्षित करण्यात आली. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चक्रानुक्रमे व सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी चक्रानुक्रमे पध्दतीने सभापतीपदे आरक्षित करण्यात आली. 
 
वर्धा पंचायत समितीचे सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सेलू सर्वसाधारण महिला, देवळी व हिंगणघाट सर्वसाधारण, समुद्रपूर अनुसूचित जाती महिला, आर्वी सर्वसाधारण महिला, आष्टी अनुसूचित जमाती व कारंजा पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
 
 
 
21:09 PM (IST)  •  04 Nov 2022

शरद पवार उद्या 9 वाजता महालक्ष्मी रेडकोर्स येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे निघणार

शरद पवार उद्या 9 वाजता महालक्ष्मी रेडकोर्स येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे निघतील आणि सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी शिर्डी येथे पोहोचणार आहेत. पुन्हा 1 वाजून 30 मिनिटांनी मुंबईच्या दिशेने निघतील आणि पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात जाऊन दाखल होतील

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget