(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Facebook India Head Resigns: फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी दिला राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण
Facebook India Head Resigns: मेटा (फेसबुक) इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी राजीनामा दिला आहे.
Facebook India Head Resigns: फेसबुकची मूळ कंपनी मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन (Facebook India Head Ajit Mohan) यांनी आज अचानक राजीनामा दिला. वृत्तानुसार, अजित मोहन यांनी अचानक राजीनामा दिल्याने फेसबुकच्या कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. अजित मोहन हे जानेवारी 2019 मध्ये फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रुजू झाले होते. याआधी उमंग बेदी या फेसबुक इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. ज्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये पद सोडले. अजित मोहन यांच्या राजीनाम्याची माहिती मेटा प्लॅटफॉर्मने जाहीर केली आहे. मोहन यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मेटा इंडियाचे संचालक आणि भागीदारी मनीष चोप्रा हे त्यांच्या जागी कंपनीचा अंतरिम कार्यभार स्वीकारणार आहेत.
स्नॅपचॅटमध्ये करणार नवीन सुरुवात
फेसबुक व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित मोहन हे दुसऱ्या ठिकाणी रुजू होणार आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजित मोहन फेसबुक इंडियाच्या प्रतिस्पर्धी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म स्नॅपचॅटमध्ये सामील होणार आहेत. मोहन हे स्नॅपचॅटमध्ये आशिया-पॅसिफिकचे प्रमुख म्हणून काम पाहतील.
मेटा मधील ग्लोबल बिझनेस ग्रुपचे उपाध्यक्ष (Vice President) निकोला मेंडेलसोहन (Nicola Mendelsohn) म्हणाले आहेत की, अजित मोहन यांनी त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या गेल्या 4 वर्षांच्या कार्यकाळात अजित मोहन यांनी भारतात कंपनी वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते म्हणाले की, आम्ही भारतासाठी वचनबद्ध आहोत आणि आमच्याकडे कंपनीचा विकास साधत सर्व काम पुढे नेण्यासाठी एक मजबूत नेतृत्व आणि टीम आहे.
Meta India head Ajit Mohan resigns
— ANI Digital (@ani_digital) November 3, 2022
Read @ANI Story | https://t.co/bzsHTVoQm4#MetaIndia #AjitMohan #Meta pic.twitter.com/qYqzOKsUi0
दरम्यान, 2019 मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून फेसबुक इंडियात रुजू झालेल्या अजित मोहन यांनी कंपनीत काम करत असताना WhatsApp आणि Instagram चे भारतात 200 मिलियनहून अधिक युजर्स झाले. मेटापूर्वी मोहन यांनी स्टार इंडियाच्या व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा हॉटस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 4 वर्षे काम केले.
इतर महत्वाच्या बातम्या: