एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra News Updates 03 October 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला पाठिंबा देणार : शरद पवार

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 03 October 2022 : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला पाठिंबा देणार : शरद पवार

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 

संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपणार

पत्राचाळ घोटाळााप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची आज न्यायालयीन कोठडी संपतेय. त्यामुळे आज त्यांना पुन्हा पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे. 

बीडच्या  शिरूर कासारमध्ये मोर्चा 

मराठा समाजाला 50 टक्केमधून कुणबी मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या मागणी साठी आज शिरूर कासारमध्ये सकाळी 10.30 वाजता मोर्चा होणार आहे.  
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  भंडारा दौऱ्यावर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला नाना पटोले उपस्थित रहाणार आहेत. 
  
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनच्या पायाभरणीचा शुभारंभ

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते औरंगाबाद आणि जालना रेल्वे स्थानकांवर कोच देखभाल सुविधांच्या विकासासाठी पिटलाईनच्या पायाभरणीचा शुभारंभ केलं जाणार आहे. याला रावसाहेब दानवे, भागवत कराड उपस्थित रहाणार आहेत. 
 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना ‘महर्षी’ पुरस्कार देण्यात येणार 

नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आज दिला जाणार आहे.  पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात होणार आहे. 

मंत्री चंद्रकांत पाटील  सोलापूर दौऱ्यावर

उच्च आणि तंत्रक्षिण मंत्री चंद्रकांत पाटील आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.  जिल्ह्यात ते विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. 
 
 जामखेडच्या खर्ड्यात आज महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन 
जामखेडच्या खर्ड्यात आज महाराष्ट्रातील सर्वात उंच रावण दहन होणार आहे. संभाजीराजे छत्रपतींसह रामायण मालिकेतील कलाकार या रावण दहनासाठी उपस्थित राहणार आहेत. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता, दारिद्रय अशी दहा तोंड असलेल्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन होणार आहे. 75 फुटी रावणाची प्रतिकृती असणार आहे.
 
केंद्रीय मंत्री रामदास आठवले  जळगाव दौऱ्यावर  

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

जोधपूर 

भारतीय हवाई दलात आजपासून लढाऊ हेलीकॉप्टर (एलसीएच) सहभागी होणार आहे. मंत्री राजनाथ सिंग आणि एअर चीफ मार्शल वी आर चौधरी यांच्या उपस्थित आजपासून 10 हेलिकॉप्टर कमिशन होणार आहे.  

अमित शाह आजपासून जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या व्यस्त कार्यक्रमाला सुरुवात करणार आहेत.
 
जयपूरमध्ये अशोक गेहलोत यांची  पत्रकार परिषद

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज दुपारी 12.30 वाजता राज्य सचिवालयात पत्रकार परिषदेला संबोधित करतील. 

22:52 PM (IST)  •  03 Oct 2022

पती सरपंच तर पत्नी उपसरपंच दिंडोरी तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायत कौतुकास्पद निवडणूक

नाशिक जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वत्र मतदानाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातुन विस्मयकारक निवडणूक झाली आहे. जऊळके येथील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असून यात विशेष म्हणजे पती सरपंच तर पत्नी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 

22:32 PM (IST)  •  03 Oct 2022

पती सरपंच तर पत्नी उपसरपंच दिंडोरी तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायत कौतुकास्पद निवडणूक

नाशिक जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुल वाजला असून सर्वत्र मतदानाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच दिंडोरी तालुक्यातुन विस्मयकारक निवडणूक झाली आहे. जऊळके येथील ग्रामपंचायतीत सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड बिनविरोध झाली असून यात विशेष म्हणजे पती सरपंच तर पत्नी उपसरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 

19:00 PM (IST)  •  03 Oct 2022

Nagpur : दसरा दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद

नागपूर : 'दसरा' दिनानिमित्त बुधवारी, 05 ऑक्टोंबरला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या 2 ऑक्टोबर रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पाच ऑक्टोंबर रोजी 'दसरा' दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

14:11 PM (IST)  •  03 Oct 2022

बेळगावात ब्रेक फेल झाल्याने बस इमारतीला आदळली, सुदैवाने जीवितहानी टळली

Belgaon News : खासगी ट्रॅव्हल्स बसचे ब्रेक फेल झाल्याने बस एका इमारतीला जाऊन धडकली. सुदैवाने या धडकेत कोणतीही प्राणहानी झाली नाही. बेळगावात आरटीओ सर्कल येथे हा अपघात घडला. ट्रॅव्हल्स बस राणी कित्तुर चन्नमा चौकातून आरटीओ सर्कलकडे येत होती. बस उतारावरुन खाली येत असताना तिचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या ध्यानात आले. बस चालकाने प्रसंगावधान राखून बस बाजूला घेतली. फूटपाथवरील रेलिंग तोडून बस इमारतीला जाऊन आदळली. पोलीस खात्याची बांधकाम अर्धवट झालेली इमारत निर्मनुष्य  असल्याने कोणतीही हानी झाली नाही. बस चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अनर्थ घडला असता, असे तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसमधे प्रवासी नव्हते त्यामुळे देखील अनर्थ टळला. इमारतीला बस धडकल्याने बसचे समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे.

13:19 PM (IST)  •  03 Oct 2022

खोखो स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष संघ अंतिम फेरीत

अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष खोखो संघाने उपांत्य फेरीत कर्नाटक संघाचा डावाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र संघाने उपांत्य लढत 26-24 एक डाव आणि 4  अशी जिंकली. पुरुष गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने आक्रमक डावपेच आखत अप्रतिम कामगिरी बजावली. महाराष्ट्राच्या आक्रमण आणि बचावात्मक खेळासमोर कर्नाटक संघाचा टिकाव लागू शकला नाही.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Embed widget