एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 8th March 2023 : हक्कभंग नोटीशीला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ; विधानसभा अध्यक्षांची माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 8th March 2023 : हक्कभंग नोटीशीला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांना मुदतवाढ; विधानसभा अध्यक्षांची माहिती

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आजपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. विधिमंडळ आजही विरोधक शेतमालाला हमी भाव आणि इतर मुद्यांवर आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा आठवडा वादळी ठरण्याची चिन्ह आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तीन दिवसाच्या भारत दौऱ्यावर असणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याची सुरुवात गुजरातपासून होणार आहे. तर, जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. 

मुंबईत आज घडणाऱ्या इतर महत्त्वाच्या घडामोडी

- कसबा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आज मुंबईत महाविकास आघाडीमधील नेत्यांची भेट घेणार आहे. 

- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पहिल्या एमसीए महिला लीगचं सकाळी 8.45 वाजता उद्घाटन होणार आहे.

- राज्य महिला आयोगाच्यावतीनं आयोजित महिला दिनानिमीत्त जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बालगंधर्व रंगमदिर वांद्रे येथे होणार आहे.

- अँटिलिया स्फोटकं आणि मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात माजी पोलीस अधिकारी सुनील मानेचा माफीचा साक्षीदार होण्याकरता विनंती केली आहे. सुनील मानेच्या अर्जावर आज तपास यंत्रणा आपलं उत्तर कोर्टात दाखल करण्याची शक्यता आहे. 

- कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. तपास यंत्रणेकडून चालढकल सुरू असल्याचा पानसरे कुटुंबियांचा हायकोर्टात आरोप करण्यात आला आहे.

बेशिस्त वाहन चालकांमुळे लातूरमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार, दोघांवर गुन्हा दाखल

लातूर शहरातील बाह्यवळण रस्त्याहून चाकूरकडे निघालेल्या टाटा सुमो गाडीने सारोळा चौकात समोरून आलेल्या एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिल्याची घटना घडली. त्यामध्ये दुचाकीस्वार सूमोमध्ये अडकला, तरीही न थांबता चालकाने वाहन भरधाव चालवले. यामध्ये दुचाकीस्वार काही अंतरावर फरपटत गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. नयूम खाजामिया शेख टकारी (वय 40) असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 

भाजपने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांना वापरुन बाजूला केलं, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल

भाजपने पंकजा मुंडे यांनाच नाही तर अनेकांना वापरून घेतलं. यात लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, सदाभाऊ खोत, राजु शेट्टी, महादेव जानकर आदी नेत्यांना भाजप पक्षाने वापरून घेत बाजूला केल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आज अहमदनगर दौऱ्यावर होत्या, यावेळी त्या बोलत होत्या. 

23:48 PM (IST)  •  08 Mar 2023

 वन मंत्री मुनगंटीवार यांच्या तुळशी वृंदावन प्रकल्पातील संत चोखामेळा मंदिर पडल्याने खळबळ , ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह 

पंढरपूर येथील वन विभागाच्या लाखो रुपये खर्चून उभारलेल्या तुळशी वृंदावना मधील संत चोखामेळा यांचे संगमरवरी   मंदिर पडल्याने खळबळ उडाली आहे . तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 26 जनेवरी 2019   रोजी या प्रकल्पाचे उदघाटन झाले होते . केवळ चार वर्षात यातील संत चोखामेळा यांचे मंदिर कोसळल्याने ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे .  तीन दिवसांपूर्वी अचानक हे मंदिर कोसळल्याने मूर्ती देखील भंग झाली आहे . चार वर्षांतच मंदिर पडल्याने इतर संतांच्या मंदिरांच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित झाला आहे . दरम्यान या संपूर्ण कामाची चौकशी करण्याची मागणी होउ लागली आहे .

23:46 PM (IST)  •  08 Mar 2023

आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांना दिला शब्द

आदित्य ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होतील विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांना दिला शब्द

सुनील शिंदे, विधानपरिषद आमदार ठाकरे गट भाषण

रश्मी वहिनी तुम्ही कार्यक्रमाला आलात

ही वरळी शिवसेनेची आहे, ही वरळी उद्धव साहेबांची आहे, ही वरळी आदित्य साहेबांची असेल

वहिनी मी तुम्हाला शब्द देतो कि आदित्य ठाकरे इथूनच मुख्यमंत्री होतील

मुख्यमंत्री झाल्यानंतर याच मंचावर आम्ही त्यांचा सत्कार करू

23:33 PM (IST)  •  08 Mar 2023

Mumbai Crime News : घाटकोपर मध्ये उचभ्रू इमारती मध्ये दांपत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime News : घाटकोपर पूर्वेला पंतनगर कुकरेजा टॉवर मध्ये दांपत्य मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.दीपक शाह आणि रीना शाह अशी त्यांचे नाव आहेत. ते कुकरेजा टॉवर मध्ये जी 501 या घरात राहत होते.मंगळवारी धुळवड खेळून हे दांपत्य घरी गेले.काल जेव्हा त्यांची घरकाम करणारी बाई घरी आली तेव्हा ते दरवाजा उघडत नव्हते.त्या महिलेने शहाच्या नातेवाईकांना कळवले.त्यानी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले

23:08 PM (IST)  •  08 Mar 2023

अकलूज येथील व्यापार्यांची 70 लाखांची फसवणूक

जादूटोणा करून तुमची कामे करून देतो म्हणून सांगत अकलूज येथील व्यापार्यांची 70 लाखांची फसवणूक .. भिवंडी परिसरातील 6 जणं ताब्यात .. त्यांच्याकडून मौल्यवान काळी हळद आणि इतर जादूटोणा साहित्य ताब्यात घेतले आहे .. ही पावडर रेडिओ ऍक्टिव्ह असल्याचे सांगत या मंत्रिकांनी त्यासाठीचे खास सूट देखील आणले होते .. तुम्हाला हात न लावता कुलुपे उघडून दाखवतो असे सांगून त्यांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मात्र कुलूप न उघडल्यावर या मंत्रिकांनी अमेरिकेतून एक पावडर मागवावी लागेल असे सांगितले . आपली फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच या पटेल नावाच्या व्यापाऱ्याने पोलिसांना बोलावले . पोलिसांनी फॉरचूनर , इनोव्हा , तवेरा सह एक गाडी आणि सहा मंत्रिकांनी ताब्यात घेतले आहे

22:45 PM (IST)  •  08 Mar 2023

घाटकोपर पूर्वेला पंतनगरच्या हद्दीत एक दाम्पत्य घरात मृतावस्थेत सापडले

घाटकोपर पूर्वेला पंतनगरच्या हद्दीत एक दाम्पत्य घरात मृतावस्थेत सापडले आहे

 दीपक शाह 42 आणि रीना शाह 39 अशे त्यांचे नाव असून ते कुकरेजा टॉवर, G-501, इथे राहत होते.

आज सकाळी या सांदरबत पोलिसांना माहिती भेटली होती.

उद्या पोस्ट मॉर्टेम होणार असून नेमका मृत्यूचा कशी झाली हे स्पस्ट होणार. 

शहा पूर्वी कपड्यांचा व्यवसाय करत होते.  मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 पंत नगर पोलिस पुढील तपास करत आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget