Maharashtra News Updates 02 March 2023 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आजपासून महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने दहावीच्या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाने पावले उचलली असून भरारी पथके नियुक्त केली आहेत. विधिमंडळ अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आजही उमटण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी आहे. तर, सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे.
तीन राज्यात विधानसभा निवडणूक मतमोजणी
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी 88 टक्के मतदान झाले होते. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 84 टक्के तर मेघालयमध्ये 76 टक्के मतदान झाले होते. आज तिन्ही राज्यात मतमोजणी होणार आहे. या राज्यात सत्तांतर होणार की सत्ताधारी पक्ष कायम राहणार,
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आज पुन्हा एकदा विधान भवनात सत्ताधारी आक्रमक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या आक्रमकतेला कसं उत्तर द्यायचं यासाठी महाविकास आघाडी रणनीति आखणार आहे. विधिमंडळाची हक्कभंग समिती स्थापन झाली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक
- महाविकास आघाडीची आज संध्याकाळी मुंबईतील सीसीआय येथे बैठक होणार आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना बैठकीसाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे अजित पवार उपस्थित राहणार. बैठकीत अधिवेशनातील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे.
आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू
आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार आहे. राज्यात 15,77,256 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. राज्यातील 5033 परीक्षा केंद्रावर ही बोर्ड परीक्षा होणार आहे. बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी विशेष अभियान राज्यभरात राबविले जात आहेत.
मुंबई
- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यांच्या विविध मागण्यांबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे.
- खासदार नवनीत राणा यांच्या बनावट जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी दंडाधिकारी कोर्टात आज सुनावणी. कोर्टात राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात कोर्टात सतत गैरहजर राहिल्यानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.
- पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी.
- पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.
छत्रपती संभाजीनगर
- गॅस दरवाढ, इंधन दरवाढी विरोधात शहर जिल्हा कॉंग्रेसकडून आंदोलन
जालना
- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर जिल्हा दौऱ्यावर आहेत.वर्धा
- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या शिवगर्जना अभियान आज वर्धा येथे होणार आहे. खासदार अरविंद सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
- स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे, यासाठी 21 फेब्रुवारी ते 5 मार्च सिंदखेडराजा ते नागपूर विदर्भ राज्य निर्माण यात्रा वामनराव चटप यांच्या नेतृत्वात सुरू आहे. ही यात्रा सकाळी हिंगणघाट शहरात येणार आहे.
अकोला
- शिवसंवाद यात्रेनिमित्त सुषमा अंधारे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
यवतमाळ
- शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे याची संजय राठोड याच्या बालेकिल्ला मध्ये जाहीर शिवगर्जना सभा होणार आहे.
- विद्या चव्हाण प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी महाराष्ट्र यांची जनजागार यात्रा यवतमाळ येथे येत आहे.
Gadchiroli: गडचिरोलीत 156 ग्राम वीज सेवकांचे बेमुदत उपोषण आंदोलन, मानधन वाढीसह कौशल्य प्रशिक्षण आणि महावितरण कंपनीत सामावून घेण्याची मागणी
महावितरण कंपनीच्या गडचिरोली मुख्यालयापुढे गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम वीजसेवकांनी आजपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. पेसा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या या ग्राम वीजसेवकांनी गेली अनेक वर्षे आपली सेवा दुर्गम -नक्षलग्रस्त भागात दिली आहे. त्यांना पुनर्नियुक्तीचे आदेश सहजपणे दिले जात असताना यंदा मात्र ते आदेश जारी झालेले नाहीत. अशा स्थितीत त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या सर्व 156 ग्राम वीज सेवकांनी बेमुदत उपोषण आंदोलन करून आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. मानधन वाढ ,कौशल्य प्रशिक्षण, विमा कवच व महावितरण कंपनीत सामावून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Gadchiroli Marriage : नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील क्षेत्रात, 125 जोडपे अडकले विवाहबंधनात
Hingoli SSC Exam Copy : कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्रावर गर्दी, पोलिसांच्या समोर दिल्या जातात कॉपी
दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबवले जातं आहे. परंतु हे कॉपीमुक्त अभियान फक्त नावापुरतेच आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतोय. कारण हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा येथील माध्यमिक आश्रम शाळेच्या 10 वीच्या परीक्षा केंद्रावर कॉफीचा सुळसुळाट पाहायला मिळाला आहे. परीक्षा केंद्राच्या मागच्या बाजूने आणि खिडकीच्या जवळ कॉपी देताना नागरिक मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होतोय.
HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेवरील बहिष्कार आंदोलन संघटनांकडून मागे
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसोबत त्यांच्या विविध मागण्या संदर्भात बैठक घेतली. या सकारात्मक बैठकीनंतर बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांवरील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. बारावी बोर्ड परीक्षा सुरू असताना आपल्या विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला होता.
GONDIA RTE SCHOOL ISSUE : प्रतिपुर्ती अनुदानाचे 16 कोटी थकल्याने आरटीई अंतर्गत ‘नो’ प्रवेश, शाळा संचालकांचा पवित्रा
गोंदिया जिल्हयात 160 शाळांमध्ये 25 टक्के जागेवर आरटीई अंतर्गत आर्थिक आणि दुर्बल घटकात मोडणा-या विद्यार्थ्यांना खासगी प्रवेश दिले जाते, त्या मुळे आर्थिक आणि दुर्बल घटकात मोडणाऱ्या 10 हजार विद्यार्थाना चांगले शिक्षण मिळत आहे. मात्र येणाऱ्या सत्र पासून या विद्यार्थाना चांगल्या शिक्षणा पासून वंचित राहावे लागणार असल्याचे चित्र गोंदियात दिसत आहेत, गोंदिया जिल्ह्यातील 160 अश्या शाळा आहेत. ज्या मध्ये शासनाच्या आरटीई कायदा अंतर्गत शिक्षण घेत आहेत. मात्र या 160 शाळेला मागील 2012-13 ते 2021-22 पर्यंत शासना कडून मिळणारे अनुदान मिळत नसून या शाळेतील संचालकांनी या वर्षीच्या सत्र पासून शाळेत आरटीई कायदा अंतर्गत येत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेणार नसल्याचे आरटीई गोंदिया जिल्हाध्यक्ष आर.डी. कटरे यांनी सांगितले आहे. त्याच प्रमाणे जे शाळा या वर्षी वर्षीच्या सत्र पासून आरटीई कायदा अंतर्गत विद्यार्थाना प्रवेश देणार नाही किंवा नाकारणार त्या शाळेवर नियमानुसार कार्यवाही करू असे शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये म्हणाले आहे.