Maharashtra Live Updates 29th May 2023 : मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
9 Years Of Modi Government: मोदी सरकारची 9 वर्ष, भाजप राबवणार जनसंपर्क अभियान; आज देशभरात केंद्रीय मंत्र्यांची पत्रकार परिषद
Modi Government 9 Years: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला (BJP Government) नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या प्रवासातील मोदी सरकारचं (Modi Government) यश सांगण्याची जबाबदारी आता केंद्रीय मंत्र्यांवर देण्यात आली आहे. सोमवारी (29 मे) केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. या दरम्यान देशातील प्रत्येक राज्याच्या राजधान्यांमध्ये केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
जेथे भाजपचे सरकार असेल तिथे केंद्रीय मंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह पत्रकार परिषद घेतील आणि जिथे भाजपचं सरकार नसेल तिथे केंद्रीय मंत्री पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह माध्यमांना संबोधित करतील. यावेळी मोदी सरकारच्या गेल्या 9 वर्षातील सर्व कामगिरीवर आधारित सादरीकरणही करण्यात येणार आहे. तसेच, मोदी सरकारनं केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा, प्रकल्पांचा आढावा घेतला जाईल.
'या' शहरांमध्ये प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) मुंबईत, अनुराग ठाकूर (Anurag Thakur) अहमदाबादमध्ये, मीनाक्षी लेखी (Meenakshi Lekhi) बेंगळुरूमध्ये, हरदीप पुरी (Hardeep Singh Puri) लखनौमध्ये, अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) गुवाहाटीमध्ये, भूपेंद्र यादव (Bhupender Yadav) भोपाळमध्ये, अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) हैदराबादमध्ये, जितेंद्र सिंह (Jitendra Singh) चेन्नईमध्ये, गजेंद्र सिंह (Gajendra Singh Shekhawat) पटना, मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) कोलकात्यात स्मृती इराणी (Smriti Irani) रोहतकमध्ये आणि पीयूष गोयल (Piyush Goyal) जयपूरमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
Wrestlers Protest: "आमच्यावर FIR दाखल करण्यास केवळ 7 तास अन् बृजभूषण यांच्याविरोधात..."; सुटकेनंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर साधला निशाणा
Wrestlers Protest News: दिल्लीच्या (Delhi) जंतरमंतरवर (Jantar Mantar) महिला कुस्तीपटुंच्या आंदोलनात (Wrestlers Protest News) सहभागी असलेल्या बजरंग पुनियाला (Bajrang Punia) पोलिसांनी मध्यरात्री सोडलं. बाहेर आल्यानंतर बजरंग पुनियानं दिल्ली पोलिसांवर (Delhi Police) निशाणा साधला आहे. बजरंग पुनिया म्हणाला की, हे या देशाचं दुर्दैव आहे, ज्याच्यावर वारंवार लैंगिक छळाचे आरोप होत आहेत, असा आरोपी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला उपस्थित होता.
बजरंग पुनिया म्हणाला की, दिल्ली पोलिसांनी आमच्याविरुद्ध केवळ 7 तासांत एफआयआर (FIR) नोंदवला, पण बृजभूषण (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यासाठी त्यांना 7 दिवस लागले. तसेच, बजरंग पुनियानं कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत पुढची रणनिती काय असेल? याबाहतही माहिती दिली. बजरंग पुनिया म्हणाला की, जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत घरी जाण्यात काहीच अर्थ नाही.
Mumbai: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल
Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी 'शिवतीर्थ'वर दाखल झाले आहेत. या भेटीबाबत अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
पाटणा: 12 जून रोजी विरोधी पक्षांची बिहारची राजधानी पाटणामध्ये बैठक होणार; मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी पक्षाचे बहुतांशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता
12 जूनला विरोधी पक्षाची बिहारची राजधानी पटना येथे बैठक
बैठकीला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार
नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षातील बहुतेक नेते हजर राहणार
मागील एक महिन्यात विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आता विरोधी पक्षाची एकजूट करण्यासाठीं नितीश कुमार यांचा पुढाकार
Beed News: बीड: जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात विहीर आणि पाण्याच्या टाकीची मंजुरी नसल्याने सरपंचां सह ग्रामस्थांच आमरण उपोषण
Beed News: बीडच्या शिरूर तालुक्यातील जांब येथे जलजीवन अंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये विहीर आणि पाण्याच्या टाकीची मंजुरी नसल्याने सरपंच आणि गावकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जाम गावाला नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी उथळा तलाव या ठिकाणाहून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. मात्र या कामांमध्ये विहिरीची आणि टाकीची मंजुरी नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं आहे.
Yavatmal News: यवतमाळ: दोन चोरांकडून सव्वापाच लाखांच्या 11 दुचाकी हस्तगत; अवधूत वाडी पोलीस ठाण्याची कारवाई
Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडल्या होत्या. अशातच अवधूतवाडी पोलिसांनी दोन चोरांसह 11 दुचाकी किंमत पाच लाख 25 हजार किमतीच्या दुचाकी जप्त केल्या श्रीकृष्ण भारत सोळंकी आणि सुरेश उर्फ विकास दत्तात्रय सुरोशे असे या चोरांची नावे आहेत.
Nashik News: नाशिक: मनमाडमध्ये पुन्हा पाऊसाची हजेरी, शेतकरी बांधवांची धावपळ
Nashik Rains Updates: गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतलेल्या अवकाळी पावसाने आज पुन्हा विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली...अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचीही चांगलीच धांदळ उडाली...व्यापारी व शेतकरी यांच्या खळ्यावरील उघड्यावर वाळत टाकलेली मका या पावसाने पुन्हा भिजली असून मका झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडाली...