एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 23rd May 2023 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल; उद्या उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 23rd May 2023 : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल; उद्या उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

ऊन पावसाचा खेळ मांडला! विदर्भात 5 दिवस पावसाचा अंदाज, काही जिल्ह्यात घामाच्या धारा 

Weather in Maharashtra : महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर हवामान बदल होताना दिसून येत आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता पुन्हा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात विविध ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. विदर्भातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. दुसरीकडे मुंबईत तापमानात घट झाली असली तरी वाढलेली आर्द्रता घाम फोडत आहे. मुंबईत सध्या प्रचंड उकाडा वाढलेला असताना विदर्भात मात्र अवकाळी पावासाचं संकट उभं ठाकलंय. नागपूर वेधशाळेनं हा इशारा दिलाय.  त्यामुळे एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे पाऊस असं विचित्र वातावरण सध्या राज्यात दिसून येतंय. मान्सून दाखल होईपर्यंत ही विचित्र परिस्थिती कायम राहणार असल्याचं वेधशाळेनं म्हटलं आहे.

पुढील 4 ते 5 दिवस राज्यात विविध जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी घामाच्या धारा निघत आहेत. मुंबईसह काही नागरिक उकाड्याने त्रस्त आहेत.

Jayant Patil: अखेर नऊ तासाच्या चौकशीनंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर पडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Jayant Patil: राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांची आज तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ईडी कार्यालयातून (ED office) बाहेर आल्यानंतर जयंत पाटील हे जवळच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. आपण ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं दिली असल्याचेही पाटील यांनी सांगितले. 

जयंत पाटील यांच्यावर आयएल अँड एफएस कंपनीशी संबंधित गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील काही वर्षांपूर्वी नोटीस देण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर गुन्ह्यातील आर्थिक व्याप्ती पाहता ईडीने हे प्रकरण आपल्याकडे घेतले होते.

23:49 PM (IST)  •  23 May 2023

Mumbai: शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेविका नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांचा शिंदे गटात प्रवेश

Shiv Sena:  मुंबईतील प्रभाग क्रमांक 121च्या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे आणि शाखाप्रमुख मनीष नायर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पाहून ते आपल्या प्रभागातील प्रलंबित विकासकामे नक्की पूर्ण करतील याची खात्री वाटल्यानेच आज शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे चंद्रावती मोरे यांनी यावेळी सांगितले

22:32 PM (IST)  •  23 May 2023

Water Crisis: नांदेड: लोहा शहरवासियांना पाणीपुरवठा करणारा सुनेगाव तलाव आटला

Nanded News:  लोहा शहराला पाणीपुरवठा करणारा सुनेगाव तलाव आटला आहे. या तलावात केवळ दोन दिवसा पुरेल एवढे पाणी उरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सारखी भीषण पाणीटंचाई निर्माण होते की काय, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

लोहा शहराला सुनेगाव तलावातून पाणी पुरवठा होतो. आता या तलावात जवळच्या तीन चार गावांना पाणीपुरवठा होत असतो. या गावांत पाणीपुरवठा उद्भवन विहिरीचे काम सुरू आहे. काही गावाला पाणी पुरवठा सुरू आहे. लिंबोटी धरणातून नदीद्वारे सुनेगाव तलावात पाणी सोडले जाते. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात पाणी समस्या तीव्र होणार हे गृहीत धरून व तलावातून रब्बी हंगामाला पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे तहावाने आता गाळ गाठला आहे. तलावात खड्ड्या खड्यात पाणी आहे आणि ते फार तर दोन दिवस जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

21:34 PM (IST)  •  23 May 2023

Mumbai: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल; उद्या उद्धव ठाकरे यांची घेणार भेट

Mumbai: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबई दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार संजय सिंह हेदेखील आहेत. उद्या अरविंद केजरीवाल आणि आपचे नेते शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

20:34 PM (IST)  •  23 May 2023

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

मलकापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मलकापूर-बुलढाणा मार्गावर अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, वाहतूक काही काळासाठी ठप्प

अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत

13:29 PM (IST)  •  23 May 2023

जयंत पाटील यांना आमचाही पाठिंबा, पुढची निवडणूक मी की रोहित लढणार हे आता सांगू शकणार नाही; आमदार सुमनताई पाटील यांची प्रतिक्रिया

Sangli News : आमचा जयंत पाटील यांना पाठिंबा आहे अशी प्रतिक्रिया तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली. आगामी विधानसभा ही रोहित लढणार की तुम्ही या प्रश्नावर बोलताना मात्र हसत सुमनताई यांनी पुढची निवडणूक मी कr रोहित लढणार हे आता सांगू शकणार नाही, असे सांगत आमदार सुमनताई पाटील यांनी यावर भाष्य करणे टाळले.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh Case : तपासावर समाधानी नाही, मारेकऱ्यांना तात्काळ अटक कराTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP MajhaSambhaji Raje on Santosh Deshmukh Case : Dhananjay Munde यांनी राजीनामा द्यावा ; संभाजीराजेTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार; काँग्रेसच्या पत्रानंतर केंद्र सरकारचा निर्णय
Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
वाल्मिक कराडला अद्याप अटक का नाही? छत्रपती संभाजीराजेंचा संतप्त सवाल; म्हणाले, धनंजय मुंडेंना...
Ind vs Aus 4th Test Day-3 : तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात टीम इंडियाला 2 धक्के! फॉलोऑन वाचवण्यासाठी 'इतक्या' धावांची गरज, भारत 'ही' कसोटी जिंकणार?
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Embed widget